भारतात तसेच महाराष्ट्रात कृष्णजन्मोत्सव आणि दही हंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.  
फोटो

Krishna Janmashtami 2024: कलाकारांच्या धम्माल मज्जा मस्तीत रंगणार कृष्णजन्माष्टमीचा उत्सव!

Zee Marathi: या वर्षी २५व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत झी मराठी प्रेक्षकांसाठी 'गोविंदा आला रे' हा खास कार्यक्रम घेऊन येत आहे.

Tejashree Gaikwad
या उत्सवादरम्यान तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. मोठं मोठ्या हंड्या बघण्यासाठी बालगोपाळांची गर्दी होताना आपण पाहत असतो.
उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागलेली असते
या वर्षी आपल्या २५व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत झी मराठी उत्सवामध्ये सहभागी होतोय आणि आपल्या प्रेक्षकांसाठी 'गोविंदा आला रे' हा खास कार्यक्रम घेऊन येत आहे.
हा दही हंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी संपूर्ण झी मराठी कुटुंब एकत्र आलंय.
या दही हंडी जल्लोषाचं आकर्षण असणार आहे एजे-लीलाचा भन्नाट डांस, शिवा-आशु आणि पारू आदित्यचा डान्स ऍक्ट आणि आवडत्या जोड्यांचे मजेदार खेळ.
नायिकांचा मराठामोळा साज तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक वेगळीच चमक आणणार आहे.
२५ ऑगस्ट, रविवार संध्या ६:०० वाजता झी मराठीवर हा विशेष कार्यक्रम बघता येणार आहे.
सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे कृष्ण रूपात कोण असणार तर अप्पीचा अर्जुनाचा मुलगा आणि सर्वांचा लाडका नटखट अमोल बाळकृष्णच्या रूपात येऊन खूप मस्ती करणार आहे.
कर्षण कऱ्हाडे 'गोविंदा आला रे' च सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले