छायाचित्र सौ : @SunilKumar_IPoS
फोटो

११२ वर्षे जुने देशातील सर्वात मोठे पोस्ट ऑफीस...पहा मुंबईमधील ही भव्य आणि ऐतिहासिक वास्तू

Swapnil S
१९०४ ते १९१३ दरम्यान गॉथिक, हिंदू आणि मुघलकालीन वास्तुकलाच्या मिश्रणात इंडो-सारासेनिक शैलीत बांधण्यात आलेल्या जनरल पोस्ट ऑफीसची म्हणजेच (जीपीओ) ही वास्तू ११२ वर्ष जुनी आहे.
वास्तुविशारद जॉन बेग यांनी या वास्तूला डिझाइन केले आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय देखील तयार केले आहे.
कर्नाटकातील विजापूर (विजयापुरा) येथील १७व्या शतकातील गोल गुम्बाझच्या दगडी घुमटानंतर हा घुमट भारतातील दुसरा सर्वात मोठा घुमट आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ स्थित १.२० लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या वारसास्थळाची पुनर्बांधणी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या सहकाऱ्यातून सुरू आहे.
या ठिकाणच्या थीम आणि डिझाईन पूर्णपणे भारतीय असले तरी, वास्तुविशारद जॉन बेग त्याच्या स्कॉटिश खुणा सोडायला विसरला नाही. भिंतींवर कोरलेले कमळ आणि काटेरी फुले हे स्कॉटिश खुणा दर्शवतात
या वास्तूचे बांधकाम १ सप्टेंबर १९०४ रोजी सुरू झाले आणि ३१ मार्च १९१३ रोजी पूर्ण झाले इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी नऊ वर्षे लागली. संपूर्ण बांधकामासाठी १८,०९,००० रुपये खर्च आला, असे येथील एका फलकावर नमूद केले आहे.
मागील दशकांतील दुर्लक्ष आणि अपूर्ण दुरुस्तीमुळे लुप्त झालेली या ऐतिहासिक इमारतीची भव्यता आता पुन्हा दिसू लागली आहे. इमारत बांधताना आरसीसीसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ स्थित १.२० लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या वारसास्थळाची पुनर्बांधणी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या सहकाऱ्यातून सुरू आहे. इमारतीतील बँकिंग, पार्सल वितरण आणि टपाल सेवा बंद न करता जतनाचे काम सुरू आहे.
२०१५ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि २०१८ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मात्र, कोविडमुळे विलंब झाला आणि २०२१ मध्ये काम सुरू झाले. अंतिम टप्पा २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.
आतापर्यंत या इमारतीला 22 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आणि तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस खर्च ३०% वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी स्टॅम्प गॅलरी, पोस्टल संग्रहालय याचे जतन केले जाणार आहे

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

Goa Nightclub Fire Update : 'त्या' क्षणी किमान १०० जण डान्स करत होते; प्रत्यक्षदर्शीची माहिती

Goa Nightclub Fire : आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना धीर; सरकारकडून मदतीचे आश्वासन