कंगना रणौतचा पैठणीतील रॉयल अंदाज; ट्रेडिशनल लूक सोशल मीडियावर व्हायरल (Photo-Instagram)
फोटो

कंगना रणौतचा पैठणीतील रॉयल अंदाज; ट्रेडिशनल लूक सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंग सोहळ्यात कंगनाचा पारंपरिक लूक विशेष चर्चेत आला.

किशोरी घायवट-उबाळे

'भारत भाग्य विधाता' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री कंगना रणौत सध्या व्यस्त आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंग सोहळ्यात कंगनाचा पारंपरिक लूक विशेष चर्चेत आला.

या कार्यक्रमासाठी कंगनाने महाराष्ट्राची ओळख असलेली सुंदर पैठणी साडी परिधान केली होती. आगामी चित्रपटात मराठी मुलीची भूमिका साकारणाऱ्या कंगनाचा हा खास अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

कंगनाने सोनेरी-पिवळ्या रंगाची पैठणी नेसली होती. साडीच्या काठावरील मोर आणि फुलांच्या डिझाइनमुळे तिचा लूक अधिक उठून दिसत होता. यासोबत तिने लाल रंगाचा सिल्क ब्लाऊज परिधान केला होता.

पारंपरिक लूक पूर्ण करण्यासाठी कंगनाने कुंदन चोकर आणि कानातले घातले होते. तसेच हातातील घड्याळ आणि गोल्डन हिल्समुळे तिच्या लूकला मॉडर्न टच मिळाला.

मेकअपसाठी कंगनाने साधा आणि एलिगंट लूक निवडला होता. छोट्या लाल टिकलीसह हलका मेकअप आणि न्यूड-पिंक लिपस्टिकमध्ये ती आकर्षक दिसत होती. विशेष म्हणजे नेहमीच्या कुरळ्या केसांऐवजी तिने वेगळी हेअरस्टाईल केली होती, ज्यामुळे तिचा ट्रेडिशनल अंदाज अधिक खुलून दिसला.

कंगना रणौतचा चित्रपट येत्या १२ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा रुग्णालयात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून यामध्ये कंगनाने एका धाडसी मराठी परिचारिकेची म्हणजेच अंजली कुलथे यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२