व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत अभिनेता प्रथमेश परबने साखरपुडा केला आहे. त्याने त्याच्या आयुष्याची जोडीदार निवडली असून क्षितिजा घोसाळकरसोबत त्याचा साखरपुडा झाला आहे. 
फोटो

प्रथमेशची पडली विकेट! केले साखरपुड्याचे फोटो शेअर

Swapnil S
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या दोघांच्या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
प्रथमेश आणि क्षितिजा यांनी साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. प्रथमेशनं पिंक करलरचा आऊटफिट परिधान केला होता तर क्षितिजानं पिंक कलरचा वनपीस घातला होता.
व्हॅलेंटाईन डेच्या शुभमुहूर्तावर प्रथमेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.
'आमचा व्हॅलेंटाईन डे' असं म्हणत प्रथमेशने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी या जोडीला भरभरुन शुभेच्छा दिल्या.
प्रथमेशचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि तेव्हापासून या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.
त्यातच आता प्रथमेशने क्षितिजासोबत साखरपुडा केला आहे. परबांच्या घरी आता लग्नाची धूम सुरु झाली आहे. ऐन व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार! ट्रम्प यांना आली उपरती; मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

२६ देश युक्रेनला सुरक्षा हमी देणार

देशातील मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया; ४७ टक्के मंत्र्यांवर '३०२'चे गुन्हे; ADR चा धक्कादायक अहवाल