राजकीय

विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा ; म्हणाले, "सध्या अजित पवारांचं..."

एका विशिष्ट पक्षाचा अध्यक्ष असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येऊनही सरकार वाचवण्यासाठी वेळकाढूपणा सुरु असल्याचंही ते म्हणाले.

नवशक्ती Web Desk

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. यावरुन अजित पवार गटाने आक्रमक होत त्यांना लबाड लांडग्याचं पिल्लू असं म्हटलं होतं. आता यावरुन राज्याच्या विधास सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.

याविषयी बोलताना विजय पडेट्टीवार म्हणाले की, आमदार अपात्रतेबाबतचा मुद्दा सद्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे. मात्र आता अजित दादांचं खच्चीकरण चाललं आहे. गोपीचंद पडळकर सारखा सत्ता पक्षातला आमदार त्यांना काय काय बोलतो. मात्र सत्तेसाठी लाचारी करणारे त्यावर कसं उत्तर देतील. हे महाराष्ट्र पाहतोय. मात्र ते उत्तर देऊ शकले नाहीत. असं म्हणत रोहित पवार बोलले ते सत्य आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. अजित पवार गटात जाण्यासाठी आमदारांना ब्लॅकमेल करण्यात येत आहे.

यावेळी त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, आमदार अपात्रतेबाबत अध्यक्ष वेळकाढूपणा करत आहेत. एका विशिष्ट पक्षाचा अध्यक्ष असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येऊनही सरकार वाचवण्यासाठी वेळकाढूपणा सुरु आहे. निकाली काही लागो, पण तो लवकर झाला पाहिजे, असं वडेट्टीवार म्हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री