राजकीय

भाजप-शिवसेना देवनार डंपिंगवरून आमनेसामने; आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

देवनार डंपिंगवरून आता राजकीय कलगीतुरा रंगत आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी आरोप केल्यानंतर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष, मंत्री आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडले आहे.

Swapnil S

मुंबई : देवनार डंपिंगवरून आता राजकीय कलगीतुरा रंगत आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी आरोप केल्यानंतर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष, मंत्री आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडले आहे.

देवनार डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आता काढण्यात आलेली निविदेची किंमतही २,३६८ कोटी आहे. पूर्वी काढण्यात आलेली ४,५०० कोटींची निविदा मोठी आहे, असा थेट सवाल शेलार यांनी आदित्य ठाकरेंना विचारत धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.

देवनार डंपिंग ग्राऊंड साफ करण्यासाठी २,३६८ कोटींच्या खर्चाची निविदा पालिकेने काढली आहे. यावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून टीका केली जाते आहे. या टीकेला शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एक्सवरील प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, निविदा निघताच कचऱ्यावर राजकारण करणारे आरोप करून देवनार क्षेपणभूमीबाबत रस दाखवू लागले आहे. याच कचऱ्यावरचे ‘कट-कमिशन’ खाऊन गेल्या २५ वर्षात गलेलठ्ठ झाले आहेत, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची (ठाकरे गट) सत्ता असताना २००८ मध्ये देवनार डंपिंग ग्राऊंड वरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याची किंमत ४,५०० कोटी होती. त्यावेळी आम्ही या कंत्राटाला विरोध केला होता. निधी वाया जाणार ही बाब आम्ही त्याचवेळी उघड केली होती. मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४,५०० कोटी रुपयांची देवनार डंपिंग ग्राऊंडची निविदा मंजूर केली. देवनारमध्ये आजही कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत. मुंबईकर गेली ४० वर्षे हैराण झाले आहेत, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video