राजकीय

छगन भुजबळांनी सांगितलं बंडखोरीचं कारण! म्हणाले, "आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय"

भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचं म्हटलं आहे

नवशक्ती Web Desk

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेत भाजप सोबत हातमिळवणी केली. यावर त्यांनी राष्ट्रवादीच्या मुख्यफळीतल्या ८ नेत्यांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. या नेत्यांनी भाजप सोबत जाण्याच्या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. यानंतर अजित पवार यांच्या गटाने आज मुंबईतील एज्युकेशन ट्रस्टमधील सभागृहात आमदार आणि समर्थकांचा मोळावा आजोजित केला होता. या मेळ्याव्या ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

मंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या भाषणात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीचं कारण स्पष्ट करताना आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला आहे. हा आरोप करतांना भुजबळ यांचा रोख नेमका कोणाकडे होता, मात्र त्यांच्या बोल्यातून स्पष्ट झाले नाही. यावेळी भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांच्या जवळच्या लोकांमध्ये सध्या बिनकामांच्या बडव्यांची गर्दी होत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला असून यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

आजपर्यंत ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात राजकीय नेत्यांनी बंडखोरी करत पक्षात फुट पाडली त्या त्या वेळी फुटणाऱ्या गटाने हाच आरोप केला आहे. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेतून फुटल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विठ्ठलाची उपमा देत आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला होता. यावेळी देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दैवत असल्याचं सर्वचं नेते स्पष्ट करत होते. यानंतर आज अजित पवार यांच्या सोबतच्या बंडखोर नेत्यांनी शरद पवार या पक्षाच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश