राजकीय

'उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे'... पंंतप्रधानांच्या मंचावरून नरसय्या आडम गडबडले

Swapnil S

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आले असून, आज विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी 90 हजार घरांचे लोकार्पण करण्यात आले. 30 हजार डेमो फ्लॅटची पाहणी करण्यात आली. तसेच, 10 लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमात माकप नेते व माजी आमदार आडम यांचा मोठा गोंधळ उडाला. आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मंचावरून भाषण करताना चक्क उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. मात्र, आपली चुकी लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्त केली आणि चुकीवर स्पष्टीकरणही दिलं..

नेमकं काय घडलं-

पंतप्रधान मोदी सभास्थळी दाखल झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी मंचावर आडम मास्तर बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र, आडम मास्तरांनी पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. यावेेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

काय म्हणाले नरसय्या आडम -

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, भारत सरकार, राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, अं उद्धव ठाकरे माफ करा... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे नेहमी एकत्र येत होते, त्यामुळे माझ्या तोंडात ते बसलं आहे, मी माफी मागतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशी सुरुवात आडम मास्तर यांनी केली.

नरसय्या आडम म्हणाले, “आज 15 हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते घराची चावी देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पाण्याची आवश्यकता होती. त्यावेळी मी पाण्यासाठी पंतप्रधानांकडे गेल्यानंतर त्यांनी अवघ्या महिन्याभरात प्रकल्पासाठी पाणी दिले, अशी आठवणही नरसय्या आडम यांनी सांगितले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल