राजकीय

गौतम अदानी पुन्हा राहुल गांधींच्या रडारवर ; पत्रकार परिषद घेत केला मोदींना सवाल

राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषेदेत तीन जागतिक वृत्तपत्रांचा दाखला देत गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले.

Rakesh Mali

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषेदेत तीन जागतिक वृत्तपत्रांचा दाखला देत गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले.

राहुल यांनी यावेळी उद्योगपती गौतमी अदानी यांच्यावर स्वत:चे पैसे गुंतवून गैरव्यवहार केल्याचा आरोप लावला. गार्डीयन, फायनान्शियल एक्स्प्रेसच्या बातमीचा दाखला राहुल गांधी यांनी यावेळी दिला. यात वृत्तपत्राकडे अंतर्गत कागदपत्रे आणि मेल्समधील संभाषणांचा पुरावा आहे. या कंपनीच्या गुंतवणुकदारांमध्ये दोन परदेशी व्यक्तींची नावे देखील त्यांनी सांगितली.

या पत्रकार परिषदेत राहुल यांनी ईडी आणि सीबीआयच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले. तसंच अदानींविरोधात केल्या गेल्या चौकशीबाबतही शंका उपस्थित केली. गौतम अदानींच्या विरोधात सीबीआयद्वारे एक चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत अदानींना क्लिनचीट देण्यात आली होती. काही काळानंतर क्लिनचीट देणाऱ्या अधिकाऱ्याला अदानींच्या कंपनीत नोकरी मिळाली. त्यामुळे या अधिकाऱ्याने अदानींविरोधात केलली चौकशी संशयास्पद असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू

Mumbai : अभिनेता इम्रान खानची उच्च न्यायालयात धाव; 'भारत सोडा' नोटिसला आव्हान

Mumbai : एफडीएचा निर्णय बचत गटांसाठी ‘तिखट’च; सुट्या मसाला विक्रीवर बंदी

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून पाणीकपात; पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द