राजकीय

"लोकांच्या मनात शंका, त्यामुळे...", संजय राऊत यांचं केंद्राला नवं आव्हान

संजय राऊत यांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या निकालांवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

नवशक्ती Web Desk

देशातील नुकत्याच लागलेल्या चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने देशभर जल्लोष केला आहे. कारण, चार पैकी तीन राज्यात भाजपने मोठा विजय मिळाला आहे. राजस्थान आणि छत्तीगडमध्ये भाजपने मोठी झेप घेत काँग्रेसकडून ही राज्ये हिसाकवून घेतली आहेत. तर मध्य प्रदेश हा भाजपा गड बहुमताने राखण्यात त्यांना यश आलं आहे. चार पैकी तीनही राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या निकालांवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. जनादेशाचा आपण स्वीकार करतो, पण लोकांच्या मनात शंका आहे. ती दूर केली पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

या प्रकरणी बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही जनादेशाचा स्वीकार करतो. विशेष म्हणजे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील निकालानंतर आमच्या, लोकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे एक निडवणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा आणि लोकांच्या मनात शंका दूर करा, असं संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की, लोकसभा किंवा विधानसभा एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, म्हणजे लोकांना बोलण्याची संधी राहणार नाही. आता मुंबई महापालिका आणि मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा, आम्ही तयरा आहोत, असं आव्हान राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

काल विधानसभा निवडणुकांचे निकालादरम्यान, संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी पत्रकार परिषद घेत राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला होता. काँग्रेस पक्षाला यापुढे इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांच्या पक्षात आणि इंडिया आघाडीतील समन्वयच्या बाबतीत देशभरात नव्याने विचार करण्याची गरज आली आहे. काहीही झालं तरीही इंडिया आघाडी मजबूत राहिलं, मध्य प्रदेशात इंडिया आघाडीम्हणून निवडणूक लढली असती, काँग्रेसने आपल्या काही सहकाऱ्यांना मदत केली असती, तर कांग्रेसची कामगिरी आजपेक्षा चांगली राहिली असती. असं माझं स्पष्ट मत आहे, असं राऊत म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांनी एक निवडणुक बॅलेटपेपरवर घेण्याची विनंती केली आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली