elets Tv YouTube
राजकीय

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या रमेश जाधवांची अखेर माघार

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, याच पक्षातील माजी महापौर रमेश जाधव यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. अखेर जाधव यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Swapnil S

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, याच पक्षातील माजी महापौर रमेश जाधव यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. अखेर जाधव यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रमेश जाधव यांनी ३ मे रोजी डोंबिवलीत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्याचे जाधव यांनी पत्रकारांना सांगितले होते. जाधव यांनी हा अर्ज भरल्याने अनेक पक्षांत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

सोमवारी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, पक्षाकडून मिळालेल्या आदेशानुसार मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता व पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यावर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला. वैशाली दरेकर याच महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभेसाठी अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

दिंडोरीत दुरंगी लढत; गावितांची माघार

नाशिक : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जीवा पांडू गावित यांनी सोमवारी माघार घेतल्याने आता दिंडोरीत भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा दुरंगी सामना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गावित यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.

दिंडोरीतून लढण्याची इच्छा होती. पण मविआने इथून भास्कर भगरेंना उमेदवारी दिली. मात्र, पक्षाने दिलेल्या सूचनेनुसार मी उमेदवारी मागे घेतोय, अशी घोषणा गावित यांनी केली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प