क्रीडा

१२ वर्षीय इशानने अव्वल मानांकित विक्रमादित्य कुलकर्णीला बरोबरीत रोखले

सहाव्या एसबीआय लाइफ अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत केली ही कामगिरी

वृत्तसंस्था

१२ वर्षीय ईशान तेंडोलकरने अव्वल मानांकित आणि आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीला सहाव्या एसबीआय लाइफ अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत बरोबरीत रोखले. स्पर्धेतील हा आजवरचा सर्वात धक्कादायक निकाल ठरला.

पेडर रोड येथील रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चरल सेंटर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत टॉप बोर्डवर खेळताना विक्रमादित्यने राणी प्याद्याने मॉडर्न बेनोनी बचावासह आक्रमक सुरुवात केली. मात्र ईशानने काळ्या मोहर्‍यांसह खेळताना त्याला चोख प्रत्युत्तर दिले. विक्रमादित्यने ईशानला मागे टाकण्यासाठी त्याच्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला. परंतु, ईशानने त्याच्या प्रत्येक चालीला जशास तसे उत्तर दिले. शेवटी मॅरेथॉन ९७ चालींनंतर दोन्ही बुद्धिबळपटूंनी बरोबरी मान्य केली.

दुसऱ्या ते सहाव्या बोर्डवर दुसरा मानांकित सौरभ खेर्डेकर (एलो २०९०), तिसरा मानांकित राघव (एलो २०६६), चौथा मानांकित अर्णव खेर्डेकर (एलो १७२२, सहावा मानांकितगुरु प्रकाश (एलो १६१९) आणि सातव्या मानांकित योहान बोरीचा यांनी (यलो १६३९) आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. तिसऱ्या फेरीअखेर १२ खेळाडूंनी प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तरित्या अव्वल स्थान राखले आहे. ९ खेळाडूंच्या खात्यात अडीच गुण आहेत. इंडिया चेस स्कूल आयोजित. तीन लाख रुपयांची एकूण बक्षिसे असलेल्या अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे अजून सहा राऊंड शिल्लक आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस