भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका : अभिषेकचा शतकी रुद्रावतार (Photo-X)
क्रीडा

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका : अभिषेकचा शतकी रुद्रावतार

अभिषेक शर्माने (३४ चेंडूंत १०८ धावा) गुरुवारी रात्री भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकारातील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा मान मिळवला.

Swapnil S

नवी दिल्ली : अभिषेक शर्माने (३४ चेंडूंत १०८ धावा) गुरुवारी रात्री भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकारातील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा मान मिळवला. त्याने ३० चेंडूंत साकारलेल्या शतकामुळे भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा १२७ धावांनी धुव्वा उडवला. याबरोबरच भारताने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून अभिषेकने तुफानी फलंदाजी करत ३४ चेंडूंत १०८ धावा कुटल्या. त्याने अवघ्या ३० चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. रोहित शर्माचा ३५ चेंडूंतील शतकाचा विक्रम त्याने मोडीत काढला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेले हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे, तर पूर्ण सदस्य देशांच्या फलंदाजांमध्ये हे तिसरे जलद शतक आहे. त्याला संजू सॅमसनने ५० धावांची अर्धशतकीय खेळी करत उत्तम साथ दिली. अफगाणकडून अजमतुल्ला ओमरझाई याने २७ धावांत २ बळी घेतले.

२६ वर्षीय अभिषेकचे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले असून, त्याच्या नावावर १२ अर्धशतकेही जमा आहेत. यापूर्वी त्याने २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पहिले शतक झळकावले होते, तर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध ५४ चेंडूंत १३५ धावा करताना त्याने ३७ चेंडूंत शतक केले होते.

२२२ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना अफगानिस्तानचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे ढेपाळला. संपूर्ण संघ १४.१ षटकांत अवघ्या ९४ धावांत तंबूत परतला. अफगानिस्तानकडून इब्राहिम झदरान याने सर्वाधिक २५ धावा केल्या.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Mumbai : १३६ फेरीवाल्यांवर कारवाई; दहिसरमध्ये पादचारी प्रथम अभियानाला वेग

मराठा आरक्षण याचिका नव्या पूर्णपीठासमोर; न्यायमूर्ती कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपीठ, ९ ऑक्टोबरपासून होणार नव्याने सुनावणी

दोन गटांना दोन नावे,दोन चिन्हे; तृणमूल काँग्रेसमधील वादाबाबत निवडणूक आयोगाचा फैसला, ‘लोकशाहीतील काळा दिवस’

केंद्राच्या मदतीसाठी न थांबता मदत करू; दुष्काळी स्थितीबाबत फडणवीसांचा खुलासा