आकिब नबीचा भारतीय संघात समावेश; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डेसाठी प्रसिध कृष्णाची माघार 
क्रीडा

आकिब नबीचा भारतीय संघात समावेश; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डेसाठी प्रसिध कृष्णाची माघार

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आकिब नबीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आकिब नबीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे प्रसिध कृष्णाला संपूर्ण मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

आकिब नबीचा यापूर्वी मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, प्रसिद्ध कृष्णाच्या अनुपस्थितीत आता त्याला पहिल्या सामन्यापासूनच निवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मालिकेतील पहिला सामना ४ नोव्हेंबरला ऑकलंड येथे होईल.

भारतीय संघ :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के. एल. राहुल, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, आकिब नबी.

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

मुंबईकरांना मिळणार ४०० नवे लोखंडी कचरा डबे; एका डब्यासाठी पंधराशे रुपये अधिक मोजणार

IIT Bombay Student Suicide Case : आत्महत्येची सीबीआय चौकशी करा! साहिल वाकोडेच्या पालकांची न्यायालयात याचिका

Mumbai : १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात; बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आशा सेविकांना सहा हजार रुपये, दिवाळीपूर्वी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार