क्रीडा

आफ्रिदीच्या गोलंदाजीवर आक्रमण शक्य -सचिन तेंडुलकर

सचिनने सांगितले की, रोहित व राहुल दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या धावा केल्या आहेत

वृत्तसंस्था

आयसीसी टी२० विश्वचषकात सुपर-१२चे सामने हे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. २३ ऑक्टोबरला भारत व पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. मागील विश्वचषकात पाकिस्तानने दहा गडी राखून भारताला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने हा बदला पूर्ण केला. पण पुन्हा आशिया चषक क्वालिफायरमध्ये पाकिस्तानने भारताला हरवल्याने आता टीम इंडियासाठी विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर असलेला शाहीन आफ्रिदी आता ठणठणीत होऊन विश्वचषकात पुनरागमन करणार आहे. भारतासाठी आफ्रिदी हा मोठा धोका ठरू शकतो म्हणूनच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संघाला काही खास टिप्स दिल्या आहेत.

सचिनने सांगितले की, रोहित व राहुल दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या धावा केल्या आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत त्यामुळे शाहीनला कसे सामोरे जायचे हे त्यांनीही ठरवलेच असणार. शाहीन आफ्रिदीला बॉल वर उचलून आधी मागे व मग मग थ्रो करण्याची सवय आहे. आफ्रिदी एक आक्रमक गोलंदाज आहे. त्याचा सामना करायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला थोडं सांभाळून खेळणं गरजेचे आहे. जरी बॉल स्विंग होत आहे, असे वाटत असेल तरीही तो सरळच येणार असतो हे नेहमी लक्षात ठेवा.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी