क्रीडा

ऑस्ट्रेलियाने केली टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा; स्मिथ, फ्रेसरला वगळले, मार्श करणार नेतृत्व

Swapnil S

मेलबर्न : आयपीएलमध्ये चमक दाखवणारा २२ वर्षीय जेक फ्रेसर-मॅगर्क आणि ३४ वर्षीय अनुभवी स्टीव्ह स्मिथ यांच्याशिवायच ऑस्ट्रेलियाने आगामी टी-२० विश्वचषकासाठी बुधवारी १५ जणांचा संघ जाहीर केला.

मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचे विश्वचषकात नेतृत्व करणार असून या संघात डेव्हिड वॉर्नर, नॅथन एलिस, फिरकीपटू ॲश्टन अगर या खेळाडूंना स्थान लाभले आहे. पॅट कमिन्स या संघात फक्त वेगवान गोलंदाज म्हणून खेळणार आहे. २०२१च्या विजेत्या ऑस्ट्रेलियाकडून फ्रेसर सलामीला येण्याची शक्यता होती. त्याने आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना दोन वेळा १५ चेंडूंत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. मात्र ऑस्ट्रेलियाने अनुभवी खेळाडूंवरच विश्वास दर्शवला आहे. तसेच गेल्या दशकभरात प्रथमच स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी एखादी आयसीसी स्पर्धा खेळणार नाही.

ऑस्ट्रेलियाचा संघ

मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन ॲगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त