Photo : X (All India Radio News)
क्रीडा

माजी क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचे निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक बॉब सिम्पसन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी शनिवारी (दि. १६) निधन झाले. वर्ष १९५७ ते १९७८ या कालावधीत सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ६२ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Swapnil S

सिडनी: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक बॉब सिम्पसन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी शनिवारी (दि. १६) निधन झाले. वर्ष १९५७ ते १९७८ या कालावधीत सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ६२ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

१० शतके आणि २७अर्धशतकांसह सिम्पसन यांनी कसोटीत ४,८६९ धावा केल्या आहेत. तसेच ३९ कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. १६ वर्षांचे असताना सिम्पसन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

१९८६ ते १९९६ या कालावधीत सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने १९८७विश्वचषक जिंकला होता. मध्ये सिम्पसन यांनी १९५७ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. १९६४ मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे ॲशेस सामन्यात त्यांनी पहिले कसोटी शतक झळकावले. २०१३ मध्ये सिम्पसन यांना आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये स्थान देण्यात आले.

सलामीवीर, स्लिप क्षेत्ररक्षक आणि फिरकीपटू अशा जबाबदाऱ्या बॉब हे समर्थपणे पेलावत होते. १९६० च्या दशकातील मजबूत ऑस्ट्रेलियन संघाचा ते मुख्य आधार होते. त्यांनी न्यू साऊथ वेल्स आणि ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत प्रशिक्षक म्हणूनही प्रभावी कामगिरी केली, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेअरड म्हणाले.

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास