IBF चे सरचिटणीस प्रमोद कुमार निलंबित; आर्थिक अनियमितता आणि अधिकारांच्या गैरवापराचे आरोप  X
क्रीडा

IBF चे सरचिटणीस प्रमोद कुमार निलंबित; आर्थिक अनियमितता आणि अधिकारांच्या गैरवापराचे आरोप

आर्थिक अनियमितता, चौकशीसाठी सहकार्य न करणे आणि अधिकारांचा गैरवापर केल्याच्या आरोपांवरून भारतीय बॉक्सिंग महासंघाचे (बीएफआय) सरचिटणीस प्रमोद कुमार यांना अध्यक्ष अजय सिंह यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : आर्थिक अनियमितता, चौकशीसाठी सहकार्य न करणे आणि अधिकारांचा गैरवापर केल्याच्या आरोपांवरून भारतीय बॉक्सिंग महासंघाचे (बीएफआय) सरचिटणीस प्रमोद कुमार यांना अध्यक्ष अजय सिंह यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत किंवा सक्षम प्राधिकरणाकडून निलंबनाचा आदेश बदलला अथवा रद्द केला जाईपर्यंत ही कारवाई लागू राहणार आहे.

आवश्यक मंजुरी न घेता प्रसारण व्यवस्थेसाठी कार्यादेश जारी केल्याचा आरोप प्रमोद कुमार यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भातील चौकशीत सहकार्य न केल्याचा आरोप आहे.

महासंघाच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी अनधिकृत बैठक बोलावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या निलंबन आदेशात या आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे. ही कारवाई भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या घटनेतील लागू तरतुदींच्या अधीन राहून करण्यात आली आहे.

निलंबन आदेशात ही कारवाई अंतरिम स्वरूपाची आणि संरक्षणात्मक उपाययोजना असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रमोद कुमार यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचा हा अंतिम निष्कर्ष मानता येणार नाही. लागू प्रक्रियेनुसार आरोपांची चौकशी केली जाईल. तसेच महासंघाच्या घटनेत नमूद केलेल्या संरक्षणात्मक तरतुदी, मर्यादा आणि पुनरावलोकनाच्या अटींनुसार निलंबनाचा आढावा घेतला जाईल.

पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानंतर घडामोडींना वेग

या घडामोडींच्या एक दिवसआधी प्रमोद कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह आणि कार्यकारी संचालक कर्नल अरुण मलिक यांनी अध्यक्षांविरोधात प्रस्तावित अविश्वास ठराव रोखण्यासाठी आपल्याला ‘गुन्हेगारी स्वरूपाची धमकी’ दिल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला होता. मात्र, कर्नल अरुण मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावत ते निराधार असल्याचे म्हटले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IDBI Bank Privatisation: मोठी बातमी! IDBI बँकेतील हिस्सा फेअरफॅक्सला विकणार; तब्बल ५२,८७८ कोटी रुपयांची डील

विलेपार्ले स्थानक परिसर होणार रुंद; सांताक्रूझमधील अतिक्रमणे हटवणार, अश्विनी भिडेंचे 'पादचारी प्रथम'अभियानांतर्गत निर्देश

Mumbai : तीन डोमिनोज आऊटलेट्ससह १७ खाद्य परवाने निलंबित

Mumbai : स्क्रीन टाईम, जंक फूडमुळे बाल लठ्ठपणा वाढतोय; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० प्रकरणे नोंदवली

Mumbai : पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फुटणार; JVPD उड्डाणपूल डिसेंबर २०२७ पर्यंत सुरू होणार