क्रीडा

शरीरसौष्ठव संघटक प्रशांत आपटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गेले दीड दशक ते बदलापूरात रोटरी ठाणे श्री स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करत आहेत.

Swapnil S

मुंबई : शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंच्या मदतीसाठी सदैव पाठीशी उभे राहणारे शरीरसौष्ठव संघटक प्रशांत आपटे यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शरीरसौष्ठव क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर बदलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शरीरसौष्ठव खेळावरील प्रेमापोटी ११ वर्षांपूर्वी आपटे संघटनेत दाखल झाले. प्रारंभी ते ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी बदलापूरला आरोग्य साधना हेल्थ सेंटर नावाची अद्ययावत जिमसुद्धा सुरू केली. गेले दीड दशक ते बदलापूरात रोटरी ठाणे श्री स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करत आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प