एक्स @ICC
क्रीडा

न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक; रचिनचे शतक, ब्रेसवेलची चमक; बांगलादेशचे आव्हान संपुष्टात

रचिन रवींद्रने (१०५ चेंडूंत ११२ धावा) पुनरागमनात साकारलेल्या धडाकेबाज शतकाला फिरकीपटू मिचेल ब्रेसवेलच्या (२६ धावांत ४ बळी) प्रभावी गोलंदाजीची उत्तम साथ लाभली.

Swapnil S

रावळपिंडी : रचिन रवींद्रने (१०५ चेंडूंत ११२ धावा) पुनरागमनात साकारलेल्या धडाकेबाज शतकाला फिरकीपटू मिचेल ब्रेसवेलच्या (२६ धावांत ४ बळी) प्रभावी गोलंदाजीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे न्यूझीलंडने सोमवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला () गडी आणि () चेंडू राखून धूळ चारली. सलग दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले, तर बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले.

रावळपिंडी स्टेडियमवर झालेल्या अ-गटातील या लढतीत न्यूझीलंडने बांगलादेशला ५० षटकांत ९ बाद २३६ धावांत रोखले. त्यानंतर डोक्याला झालेल्या दुखापतीतून सावरत संघात परतलेल्या डावखुऱ्या रचिनने चौथे एकदिवसीय शतक झळकावताना १२ चौकार व १ षटकार लगावला. त्याला टॉम लॅथमच्या (५५) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. ३ बाद ७२ धावांवरून लॅथम व रवींद्रने चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचली. रवींद्र बाद झाल्यावर ग्लेन फिलिप्स (नाबाद २१) व ब्रेसवेल (नाबाद ११) यांनी ४६.१ षटकांत न्यूझीलंडचा विजय साकारला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना कर्णधार नजमूल शांतोने ७७, तर जेकर अलीने ४५ धावा करत बांगलादेशला २३६ धावांपर्यंत नेले. ब्रेसवेलने मुशफिकूर रहिम (२), महमदुल्ला (४), तांझिद हसन (२४) असे महत्त्वाचे बळी मिळवले. ब्रेसवेललाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आता २ मार्चला न्यूझीलंडची भारताशी गाठ पडणार आहे. या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. तर बांगलादेश व पाकिस्तान यांचे आव्हान संपुष्टात आले.

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार