बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यंदा पुरुषांना रौप्य, महिलांना कांस्य; समरकंद येथे झालेल्या स्पर्धेत पुरुष गटात उझबेकिस्तान, महिला विभागात चीनला सुवर्णपदक (Photo-X)
क्रीडा

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यंदा पुरुषांना रौप्य, महिलांना कांस्य; समरकंद येथे झालेल्या स्पर्धेत पुरुष गटात उझबेकिस्तान, महिला विभागात चीनला सुवर्णपदक

४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाने हंगेरीविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधत टाय-ब्रेकरच्या जोरावर रौप्यपदकावर कब्जा केला, तर महिला संघाने जॉर्जियाविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधत कांस्यपदक पटकावले.

Swapnil S

समरकंद : ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाने हंगेरीविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधत टाय-ब्रेकरच्या जोरावर रौप्यपदकावर कब्जा केला, तर महिला संघाने जॉर्जियाविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधत कांस्यपदक पटकावले.

उझबेकिस्तान येथे १६ ते २७ सप्टेंबरदरम्यान यंदाची ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. भारताने २०२४च्या ऑलिम्पियाडमध्ये दोन्ही गटांत सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यामुळे यंदाही भारताचे पारडे जेतेपदासाठी जड मानले जात होते. मात्र पुरुष गटात यजमान उझबेकिस्तानने बाजी मारली, तर महिला गटात चीनने सुवर्णपदक पटकावले. यंदा भारतीय पुरुष संघात जगज्जेता डी. गुकेश, ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरिगेसी, निहाल सरिन आणि विदित गुजराती यांचा समावेश होता, तर श्रीनाथ नारायणन संघाचा कर्णधार होता. महिला संघात कोनेरू हम्पी, आर. वैशाली, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल आणि सविता श्री बी. यांचा समावेश असून स्वयंम मिश्रा कर्णधार होती.

पुरुषांच्या विभागात उझबेकिस्तानने अंतिम फेरीत युक्रेनचा २.५-१.५ असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. उझबेकिस्तानने ११ पैकी १० फेऱ्या जिंकत एकूण २० गुण मिळवले. भारतीय पुरुष संघाने १८ गुण मिळवले असून जर्मनीने हॉलंडचा पराभव केल्याने जर्मनीचेही १८ गुण झाले होते. मात्र, सरस टाय-ब्रेक गुणांच्या आधारे भारताने रौप्यपदक निश्चित केले, तर जर्मनीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिला विभागात चीनने व्हिएतनामचा ३-१ असा पराभव करत २० गुणांसह सुवर्णपदक जिंकले. द्वितीय स्थानी असलेल्या कझाकस्तानने १८ गुण मिळवले. भारताच्या बी. सविथा श्रीने १० पैकी ९ गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आणि भारताच्या कांस्यपदकात मोलाचा वाटा उचलला. अशाप्रकारे ही स्पर्धा संपन्न झाली.

गुकेश, दिव्याला वैयक्तिक पदके

वैयक्तिक कामगिरीत सविथा श्रीने सुवर्णपदक पटकावले. याशिवाय कोनेरू हंपी आणि वंतिका अग्रवाल यांनी कांस्य, तर दिव्या देशमुखने रौप्यपदक जिंकले. पुरुष विभागात प्रज्ञानंदने वैयक्तिक कांस्यपदक जिंकले, तर डी. गुकेश अंतिम फेरीत पराभूत झाल्याने त्याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. अंतिम फेरीत अर्जुन एरिगेसीने विजय मिळवला, तर प्रज्ञानंद आणि निहाल सरिन यांनी आपापले सामने बरोबरीत सोडवले.

Mumbai : झाडांसाठी नवी एसओपी; चेंबूर दुर्घटनेनंतर २६ वॉर्डांत अधिकारी

ST तील दोषी अधिकाऱ्यांना बढती; सक्षम प्राधिकाऱ्यांचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात

बोईंगच्या मॅक्स विमानांमध्ये सदोष सॉफ्टवेअर; ऑटोमेटेड फ्लाईट गायडन्स सिस्टमवर परिणाम होणार

सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता; अमेरिकेची आकडेवारी, पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम राहणार

महाराष्ट्राचे नवे केमिकल, पेट्रोकेमिकल धोरण ऑक्टोबरमध्ये; 'असोचेम' च्या शिफारशींवर शिक्कामोर्तब होणार