गुड बाय ग्लासगो, आता भेटू अहमदाबादला!राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न; भारताच्या संस्कृतीचेही दर्शन (Photo-X)
क्रीडा

गुड बाय ग्लासगो, आता भेटू अहमदाबादला!राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न; भारताच्या संस्कृतीचेही दर्शन

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे २३वे पर्व अखेर रविवारी मध्यरात्री समाप्त झाले. गेले १० दिवस रंगलेल्या या स्पर्धेद्वारे क्रीडापटूंसह चाहत्यांनी ‘गुड बाय ग्लासगो’चा नारा देत लवकरच अहमदाबादला भेटू, या आशेने स्पर्धेला निरोप दिला.

Swapnil S

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे २३वे पर्व अखेर रविवारी मध्यरात्री समाप्त झाले. गेले १० दिवस रंगलेल्या या स्पर्धेद्वारे क्रीडापटूंसह चाहत्यांनी ‘गुड बाय ग्लासगो’चा नारा देत लवकरच अहमदाबादला भेटू, या आशेने स्पर्धेला निरोप दिला. स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारतीय संस्कृतीचेही दर्शन झाले. २०३०मध्ये अहमदाबाद येथे राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहे.

ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व उत्साहात गेल्या १० दिवसांपासून सुरू होते. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले होते, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नसल्याने भारताच्या पदकसंख्येवर परिणाम होईल, असे भाकीत वर्तवले जात होते. १२२ खेळाडूंसह सहभागी झालेल्या भारताला वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडाप्रकारांतूनच सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती. या क्रीडापटूंनी हा वि‌श्वास सार्थ ठरवून भारताला पदकतालिकेत चौथे स्थान मिळवून दिले. भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य, ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके पटकावली.

समारोप सोहळ्यासाठी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि बॉलीवडू अभिनेती तसेच माजी मिस इंडिया मानुषी छिल्लर यांनी आपापले कौशल्य सादर केले. बॉक्सिंगपटू जास्मिन लंबोरिया समारोप सोहळ्यासाठी भारताची ध्वजवाहक होती. त्यामुळे एकूणच हा सोहळा देखणीय ठरला.

दरम्यान, भारताने मिळवलेल्या एकूण १३ सुवर्णपदकांपैकी ७ सुवर्णपदके बॉक्सिंग रिंगमधून आली. महिला विभागात विद्यमान जागतिक विजेती जास्मिन (५७ किलो), प्रीती पवार (५४ किलो), प्रिया घांघस (६० किलो), साक्षी चौधरी (५१ किलो) आणि अरुंधती चौधरी (७० किलो) यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या विभागात सचिन सिवाच (६० किलो) आणि अंकुश (७० किलो) यांनी सुवर्ण पटकावले. तसेच वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने सुवर्णपदक काबिज केले. ज्युदोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पटकावले. दिलीप गावित (ॲथलेटिक्स), शर्मिला धनकर, सोमन राणा यांनीही पॅरा ॲथलेटिक्समध्ये सोनेरी यश मिळवले. आता सप्टेंबर महिन्यात रंगणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय क्रीडापटूंकडून अशीच चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.

पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडून कौतुक

राष्ट्रकुल स्पर्धेत प्रमुख खेळांच्या अनुपस्थितीतही भारताने मिळवलेल्या यशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केले आहे. “संपूर्ण स्पर्धेत आपल्या क्रीडापटूंनी अफाट कौशल्य, जिद्द व चिकाटी दाखवून ३९ पदके जिंकली. मला आपल्या प्रत्येक खेळाडूचा अभिमान आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,” असे ट्वीट मोदी यांनी केले. महिलांनी १३ पैकी ८ सुवर्णपदके जिंकून भारताची मान उंचावली आहे, ही बाब मला अधिक आनंद देत असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

सलग दुसऱ्यांदा भारत चौथ्या स्थानी

भारताने सलग दुसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत चौथे स्थान पटकावले. २०२२मध्ये भारताने ६१ पदके जिंकून चौथा क्रमांक पटकावला होता, तर २०१८मध्ये भारत ६६ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर होता, हे विशेष.

यजमानपद स्वीकारले

ग्लासगो : भारताने रविवारी मध्यरात्री समारोप सोहळ्यात अधिकृतरीत्या २०३०च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे प्रमुख डोनाल्ड रुकेर यांनी भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या हाती यजमानपदाचा झेंडा सोपवला. यावेळी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी उपस्थित होते. अहमदाबाद येथे २०३०चे राष्ट्रकुल रंगणार असल्याने उषा यांच्या हस्ते मग संघवी यांना यजमानपदाचा ध्वज देण्यात आला.

ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व उत्साहात गेल्या १० दिवसांपासून सुरू होते. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले होते, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नसल्याने भारताच्या पदकसंख्येवर परिणाम होईल, असे भाकीत वर्तवले जात होते. १२२ खेळाडूंसह सहभागी झालेल्या भारताला वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडाप्रकारांतूनच सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती. या क्रीडापटूंनी हा वि‌श्वास सार्थ ठरवून भारताला पदकतालिकेत चौथे स्थान मिळवून दिले. भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य, ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके पटकावली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यासाठी उपस्थित राहू न शकल्याने संघवी यावेळी हजर होते. २०१०नंतर २० वर्षांनी भारताला राष्ट्रकुलचे यजमानपद लाभले आहे. २०३६मध्ये भारताला ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याची इच्छा आहे. त्या दृष्टीने राष्ट्रकुलचे यजमानपद भारताला मिळणे गौरवास्पद बाब आहे. त्यावेळी सर्व प्रमुख खेळदेखील परततील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर; १० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत तूर्तास निर्णय नाही - अभिजीत बांगर

पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर; मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय जारी

घाटकोपर हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द

मंत्री नितीन गडकरींच्या नागपुरातील घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पश्चिम महाराष्ट्रातील ९१५ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील; सातारा जिल्ह्यातील ३०६ गावांचा समावेश, केंद्र सरकारचा मसुदा जाहीर