Commonwealth Games 2026 Decathlon : तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये जिंकले भारताचे पहिलेच पदक X
क्रीडा

Commonwealth Games 2026 Decathlon: तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये जिंकले भारताचे पहिलेच पदक

राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या तेजस्विन शंकरने डेकॅथलॉन प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात डेकॅथलॉनमध्ये पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

Swapnil S

ग्लासगो : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या तेजस्विन शंकरने डेकॅथलॉन प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात डेकॅथलॉनमध्ये पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास सहन करत २७ वर्षीय तेजस्विनने ही दुर्मिळ कामगिरी केली. यापूर्वी त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही याच प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. दोन दिवस चाललेल्या आणि १० कठीण प्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत तेजस्विनने ७,९७६ गुण मिळवले. ग्रेनेडाच्या लिंडन व्हिक्टरने ८,०९६ गुणांसह सुवर्णपदक, तर कॅनडाच्या डॅमियन वॉर्नरने ८,०३६ गुणांसह रौप्यपदक जिंकले.

ऑलिम्पिक पदक विजेत्यांसोबत पोडियम शेअर करत तेजस्विनने भारताच्या अॅथलेटिक्स विश्वात नाव कोरले. स्पर्धेच्या सुरुवातीला तेजस्विनच्या सहभागाबद्दल अनिश्चितता होती. मंगळवारी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला त्याच्या मुख्य प्रकार असलेल्या हायजंपमधून माघार घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या लांब उडी प्रकारात त्याने ७.८२ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत अव्वल स्थान मिळवले आणि पदकाच्या शर्यतीत जोरदार पुनरागमन केले.

पहिल्या दिवसाच्या उर्वरित प्रकारांमध्ये शॉटपूटमध्ये त्याने १३.०९ मीटर फेकीसह सातवे स्थान मिळवले. त्यानंतर उंच उडी प्रकारात २.१५ मीटर कामगिरी करत त्याने अव्वल स्थान पटकवले. या स्पर्धेत २.०० मीटरचा टप्पा पार करणारा तो एकमेव खेळाडू ठरला. ४०० मीटर शर्यतीत त्याने ४९.५१ सेकंदांची वेळ नोंदवत आपल्या हीटमध्ये चौथे स्थान मिळवले. पहिल्या पाच प्रकारांनंतर तो गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

SRA सदनिकेचा बेकायदेशीर ताबा सिद्ध करण्यासाठी विक्री कराराची गरज नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

अनिल अंबानी यांच्याविरोधात CBI ने दाखल केला गुन्हा; १,८१६ कोटींचा ईपीएफओ गुंतवणूक गैरव्यवहार

मुंबई-सावंतवाडी दरम्यान नवीन एक्स्प्रेस धावणार; चाकरमानी, पर्यटकांची मोठी सोय होणार

Mumbai : टी-शर्टवरून हरवलेल्या मुलाची ओळख पटली

FIR ऑनलाइन अपलोड करण्यात दिरंगाई; सामाजिक कार्यकर्त्यांकडून कारवाईची मागणी ओशिवरा, जुहू पोलीस ठाण्यांवर आरोप