क्रीडा

मँचेस्टर युनाटेडला ख्रिस्तियानो रोनाल्डो अलविदा करणार

प्रसार माध्यमांच्या वृत्तांनुसार, रोनाल्डोने युनायटेडसमोर दुसऱ्या संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे

वृत्तसंस्था

फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आता दुसऱ्या क्लबकडून खेळण्याचा विचार करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या मोसमापूर्वीच तो मँचेस्टर युनाटेडला अलविदा करणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रसार माध्यमांच्या वृत्तांनुसार, रोनाल्डोने युनायटेडसमोर दुसऱ्या संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला आता इंग्लिश प्रीमियर लीगऐवजी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळायचे असल्याचीही माहिती आहे. मँचेस्टर युनायटेडला या हंगामात चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले. गेल्या मोसमात मँचेस्टर युनायटेडला एकही चषक जिंकता आलेला नव्हता. यानंतरच आता रोनाल्डो या क्लबसोबतचा करार संपुष्टात आणण्याची शक्यता असल्याचे खात्रीलायकिरत्या समजते. तथापि, क्लबचे नवे व्यवस्थापक एरिक टेन हॅग यांनी सांगितले की, रोनाल्डो हा क्लबसाठी खेळणार असून युनायटेडला पुन्हा विजयी मार्गावर आणणे त्याच्यावर अवलंबून असेल. गेल्या हंगामात रोनाल्डोने क्लबसाठी २४ गोल केले; परंतु युनायटेडला बहुतांश प्रसंगी पराभव पत्करावा लागला किंवा सामना अनिर्णित राहिल्याचे समाधान मानावे लागले. या संघाला एकही विजेतेपद मिळवता आले नाही. रोनाल्डो चेल्सी किंवा बायर्न म्युनिच संघात सामील होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

मात्र मँचेस्टर युनायटेडसोबतचा त्याचा करार संपण्यास आणखी एक वर्ष बाकी आहे. ३७ वर्षीय रोनाल्डोची आणखी तीन ते चार वर्षे फुटबॉल खेळण्याची इच्छा असल्याचे त्याने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. मँचेस्टर युनायटेडने गेल्या ऑगस्ट महिन्यात रोनाल्डोला युवेंटसमधून पुन्हा करारबद्ध केले होते. त्यामुळे आता रोनाल्डोला करारातून मोकळे करण्यासाठी युनायटेडला युवेंटसला दिलेले १२.९ दशलक्ष पौंड परत हवे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चेल्सीकडे करार करण्यासाठी आवश्यक निधी असल्याचेही सांगण्यात येत आहे. मालक टॉड बोहली यांनी अलीकडेच रोनाल्डोचा एजंट जॉर्ज मेंडेस याच्याशी चर्चा केली असल्याचे खात्रीलायकिरत्या समजते.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल