एक्स
क्रीडा

गुकेशने आघाडीची संधी गमावली; सातवी फेरीही बरोबरीत; दोघांच्या खात्यात ३.५ गुण

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत : भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा विद्यमान जगज्जेता डिंग लिरेन यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीची सातवी फेरी बरोबरीत सुटली. त्यामुळे सातव्या फेरीअखेर दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ३.५ गुण आहेत. बुधवारी आठवी फेरी रंगणार आहे.

Swapnil S

सिंगापूर : भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा विद्यमान जगज्जेता डिंग लिरेन यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीची सातवी फेरी बरोबरीत सुटली. त्यामुळे सातव्या फेरीअखेर दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ३.५ गुण आहेत. बुधवारी आठवी फेरी रंगणार आहे.

२५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या लढतीत पहिल्या फेरीत गुकेशला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र दुसऱ्या फेरीत गुकेशने लिरेनला बरोबरीत रोखले. तिसऱ्या फेरीतील विजयासह गुकेशने त्याच्यातील कौशल्य दाखवून दिले. त्यानंतर मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये सातत्याने बरोबरीच पाहायला मिळत आहे. मंगळवारी सातव्या फेरीतही तब्बल ५ तास आणि २२ मिनिटानंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. ही फेरी ७२ चालींपर्यंत रंगली. अखेर दोघांना अर्धा गुण बहाल करण्यात आला. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामन्याला सुरुवात होते.

जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरेल आणि जगज्जेतेपद मिळवेल. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर सामना बरोबरीत सोडवता येणार नाही. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकारात ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल. दर तीन डावांनंतर राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

डिंगने गतवर्षी रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला पराभूत करून बुद्धिबळाच्या विश्वातील पहिला चिनी जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला होता. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली आहे. तसेच त्याला नैराश्यालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे यंदाच्या लढतीत गुकेशचे पारडे जड असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. भारताकडून आतापर्यंत केवळ विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. गेल्या काही वर्षांपासून आनंदच्या मार्गदर्शनाखालीच गुकेश सराव करत आहे. त्यामुळे आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवण्याची संधी गुकेशकडे आहे.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती