इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय; मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप; रूट आणि कॉक्सची निर्णायक खेळी X
क्रीडा

इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय; मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप; रूट आणि कॉक्सची निर्णायक खेळी

नवव्या क्रमांकावरील फलंदाज रझाउल्लाह खानच्या धडाकेबाज षटकारांमुळे चौथ्या दिवसापर्यंत लांबलेली तिसरी कसोटी इंग्लंडने अखेर आठ विकेट्स शिल्लक राखून जिंकली.

Swapnil S

बर्मिंगहॅम : नवव्या क्रमांकावरील फलंदाज रझाउल्लाह खानच्या धडाकेबाज षटकारांमुळे चौथ्या दिवसापर्यंत लांबलेली तिसरी कसोटी इंग्लंडने अखेर आठ विकेट्स शिल्लक राखून जिंकली. पाकिस्तानच्या गोलंदाज मोहम्मद अब्बासने शनिवारी पहिल्याच षटकात इंग्लंडची अवस्था २ बाद २ अशी करून यजमानांना पुन्हा धक्का दिला. मात्र, कर्णधार जो रूट आणि जॉर्डन कॉक्स यांनी संयमी फलंदाजी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने एका सत्रात २४.२ षटकांत २ बाद १३० धावा करत सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका ३-० अशी खिशात घातली. विशेष म्हणजे, एक दिवस शिल्लक असतानाच इंग्लंडने हा विजय मिळवला.

इंग्लंडची सुरुवात मात्र अत्यंत खराब झाली. अब्बासने पहिल्याच षटकात बेन डकेटला यष्टिमागे झेलबाद केले. त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर एमिलियो गेलाही पायचीत बाद झाला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था २ बाद २ अशी झाली आणि पाकिस्तानला सामन्यात पुनरागमनाची आशा निर्माण झाली. त्यानंतर रूट आणि कॉक्स यांनी डाव सावरला.

रूटने नाबाद ६२, तर कॉक्सने नाबाद ५९ धावांची खेळी करत इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. या विजयामुळे इंग्लंडने २०२४ नंतर प्रथमच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्रतिस्पर्ध्याचा ३-० असा धुव्वा उडवला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई

Mumbai : आता उद्याने, मैदानांखाली भूमिगत पार्किंग; मुंबई महापालिकेचा निर्णय

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक संशयित अटकेत

मतभेदांचे रूपांतर वादात नको - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कराड : बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू; नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, चौकशीची मागणी