क्रीडा

दोन दिवस आधीच इंग्लंडचा अंतिम संघ जाहीर

बेन स्टोक्सच्या नेतृत्वात आणि ब्रँडन मॅकक्युलमच्या प्रशिक्षणात खेळणाऱ्या इंग्लंडने दोन दिवस आधीच भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

Swapnil S

लीड्स : बेन स्टोक्सच्या नेतृत्वात आणि ब्रँडन मॅकक्युलमच्या प्रशिक्षणात खेळणाऱ्या इंग्लंडने दोन दिवस आधीच भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

या संघात वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचे पुनरागमन झाले आहे. वोक्सपासूनच भारताला सर्वाधिक धोका उद्भवू शकतो. वोक्स डिसेंबर २०२४मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरची कसोटी खेळला होता. त्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर होता. तसेच ब्रेडन कार्सही संघात परतला आहे.

दरम्यान, इंग्लंडने तिसऱ्या क्रमांकासाठी ओली पोपला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जेकब बेथलला प्रतीक्षा करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध बेथलने तिसऱ्या, तर पोपने यष्टिरक्षणाची भूमिका बजावतानाच सहाव्या स्थानी फलंदाजी केली होती. स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या गोलंदाजीचीही कसोटी लागणार आहे. त्यांनी शोएब बशीरच्या रूपात एकमेव फिरकीपटूला संघात स्थान दिले आहे.

इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत