FIFA World Cup 2026 : मेस्सीच्या अर्जेंटिनाला रोखण्याचे सलाहच्या इजिप्तपुढे आव्हान (Photo-X)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : मेस्सीच्या अर्जेंटिनाला रोखण्याचे सलाहच्या इजिप्तपुढे आव्हान

तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ मंगळवारी रात्री इजिप्तविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे.

Swapnil S

अटलांटा : तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ मंगळवारी रात्री इजिप्तविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. त्यामुळे मोहम्मद सलाहचा इजिप्त अर्जेंटिनाला रोखू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच बुधवारी मध्यरात्री दुसऱ्या लढतीत कोलंबिया आणि स्वित्झर्लंड आमनेसामने येतील.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. आता विश्वचषक स्पर्धेचा थरार उपउपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर असून प्रत्येकी लढतीनंतर थरार वाढत आहे.

दरम्यान, अर्जेंटिनाने आय गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना साखळी फेरीत तिन्ही सामने जिकले. त्यांनी अनुक्रमे अल्जेरिया, ऑस्ट्रिया व जॉर्डन यांना धूळ चारली. त्यानंतर अर्जेंटिनाने राऊंड ऑफ ३२ लढतीत कापे व्हर्डेवर ३-२ अशी मात केली. अर्जेंटिनाने ४ सामन्यांत १० गोल केले असून त्यांपैकी ७गोल मेस्सीच्या नावावर आहेत. त्यामुळे मेस्सी यंदाच्या विश्वचषकात गोल्डन बूटच्या शर्यतीत फ्रान्सच्या किलियान एम्बाप्पेसह संयुक्तपणे अग्रस्थानी आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल