FIFA World Cup 2026 : ऑस्ट्रिया-अल्जेरिया सामना बरोबरीत; दोन्ही संघ बाद फेरीत दाखल X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : ऑस्ट्रिया-अल्जेरिया सामना बरोबरीत; दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

फिफा विश्वचषकात ऑस्ट्रिया आणि अल्जेरिया यांच्यातील गटसाखळी फेरीतील शेवटचा सामना ३-३ अशा अटीतटीच्या वातावरणात बरोबरीत सुटला. या निकालामुळे दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला असून, इराणचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सामन्याच्या स्टॉपेज टाइममध्ये गोलची झालेली बरसात या लढतीचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

Swapnil S

कॅन्सस सिटी : फिफा विश्वचषकात ऑस्ट्रिया आणि अल्जेरिया यांच्यातील गटसाखळी फेरीतील शेवटचा सामना ३-३ अशा अटीतटीच्या वातावरणात बरोबरीत सुटला. या निकालामुळे दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला असून, इराणचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सामन्याच्या स्टॉपेज टाइममध्ये गोलची झालेली बरसात या लढतीचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला अल्जेरियाच्या रियाद महारेजने आपला दुसरा गोल करत संघाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, काही क्षणांतच ऑस्ट्रियाच्या सासा कलैदझिचने हेडरद्वारे गोल करत सामना ३-३ असा बरोबरीत आणला. मार्को अर्नाउटोविच आणि मार्सेल सबित्झर यांनी ऑस्ट्रियासाठी, तर रफिक बेलघलीने अल्जेरियासाठी गोल नोंदवले. ऑस्ट्रियाने गटात अर्जेंटिनानंतर दुसरे स्थान मिळवले असून, १९८२ नंतर त्यांनी पहिल्यांदाच बाद फेरीत धडक मारली आहे. आता गुरुवारी होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात त्यांचा मुकाबला स्पेनशी होणार आहे.

आफ्रिकेतील दहापैकी नऊ संघ बाद फेरीत पोहोचले असून, अल्जेरिया हा त्यापैकी एक ठरला आहे. अल्जेरियाचा पुढचा सामना गुरुवारी व्हँकुव्हर येथे स्वित्झर्लंडशी होईल. कॅन्सस सिटीच्या ‘ॲरोहेड स्टेडियम’वर ६९,०४५ प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना खेळला गेला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल