कोलंबियाची कमाल; दुसऱ्या विजयासह बाद फेरीत Photo : X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : कोलंबियाची कमाल; दुसऱ्या विजयासह बाद फेरीत

डॅनिएल मुनोजने ७६व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर कोलंबियाने काँगो प्रजासत्ताकवर १-० अशी मात करत के-गटातून फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश केला.

Swapnil S

ग्वादालाजरा : डॅनिएल मुनोजने ७६व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर कोलंबियाने काँगो प्रजासत्ताकवर १-० अशी मात करत के-गटातून फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश केला.

मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या सामन्यात कोलंबियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. या विजयामुळे कोलंबियाचे दोन सामन्यांत ६ गुण झाले असून त्यांनी बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांची आता अखेरच्या लढतीत रविवारी पोर्तुगालशी गाठ पडेल. पोर्तुगाल ४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सामन्याच्या ७६व्या मिनिटाला मुनोजने डाव्या पायाने जबरदस्त गोल करत कोलंबियाचे खाते उघडले. काँगोचा गोलरक्षक लिओनेल मपासीने सुरुवातीच्या २० मिनिटांत पाच कठीण बचाव करत कोलंबियाला रोखून धरले होते. मात्र, मुनोजच्या गोलवर त्याला काहीही करता आले नाही. सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा मुनोज याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत काँगोने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोलंबियाचा गोलरक्षक कॅमिलो वर्गासने नॅथनेल म्बुकूचा लांब पल्ल्याचा फटका आणि चॅन्सेल म्बेम्बाचा हेडर रोखून संघाचा विजय सुरक्षित केला.

कोलंबियाचे प्रशिक्षक नेस्टर लोरेन्झो यांनी विजयाचे श्रेय देताना सांगितले की, काँगोने कठीण आव्हान दिले होते, तरीही आम्ही योग्य पद्धतीने विजय मिळवला. दुसरीकडे, काँगोचे प्रशिक्षक सेबॅस्टियन डेसाब्रे यांनी गोलरक्षक लिओनेल मपासीच्या कामगिरीचे कौतुक केले. कोलंबियाचा स्टार खेळाडू लुईस डायझचे दोन गोल बाद करण्यात आले होते, ज्यामुळे सामन्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कोलंबियाने पहिल्या लढतीत उझबेकिस्तानला ३-१ असे पराभूत केले होते. आता ते पोर्तुगालला कशी झुंज देणार, हे पाहणे रंजक ठरेल. पोर्तुगालने बुधवारीच उझबेकिस्तानचा धुव्वा उडवून लय गवसल्याचे दाखवून दिल्याने त्यांना कमी लेखणे धोकादायक ठरेल.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल