क्रोएशियाने गुणांचे खाते उघडले; पनामा स्पर्धेबाहेर Photo : X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : क्रोएशियाने गुणांचे खाते उघडले; पनामा स्पर्धेबाहेर

अँटे बुदिमीरने ५४व्या मिनिटाला नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर क्रोएशियाने एल-गटात पनामावर १-० असा विजय मिळवला. या पराभवामुळे पनामाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे, तर क्रोएशियाने बाद फेरीतील आपली दावेदारी कायम ठेवली आहे. टोरंटोमध्ये झालेल्या या सामन्यात उत्तरार्धात क्रोएशियाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांना विजय मिळवता आला.

Swapnil S

टोरंटो : अँटे बुदिमीरने ५४व्या मिनिटाला नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर क्रोएशियाने एल-गटात पनामावर १-० असा विजय मिळवला. या पराभवामुळे पनामाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे, तर क्रोएशियाने बाद फेरीतील आपली दावेदारी कायम ठेवली आहे. टोरंटोमध्ये झालेल्या या सामन्यात उत्तरार्धात क्रोएशियाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांना विजय मिळवता आला.

सामन्याच्या ५४व्या मिनिटाला जोसिप स्टॅनिषिकने दिलेल्या क्रॉसवर अँटेने गोल करत क्रोएशियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मैदानात उतरल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत अँटेने हा गोल नोंदवला. या विजयामुळे क्रोएशियाचे तीन गुण झाले असून, त्यांच्या बाद फेरीतील प्रवेशाचे गणित शनिवारी घानाविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या गट सामन्यावर अवलंबून आहे. सामन्यात लुका मॉड्रिकने आपल्या कारकिर्दीतील २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तीन मिनिटांनंतर मॉड्रिकने मार्को पासालिचला दिलेला पास गोलमध्ये रूपांतरित करण्यापासून पनामाचा गोलरक्षक ऑर्लेंडो मॉस्केराने रोखले.

पनामाने बरोबरी साधण्यासाठी ६७व्या मिनिटाला तीन सलग प्रयत्न केले होते, मात्र क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिवाकोविचने उत्कृष्ट बचाव करत संघाची आघाडी टिकवून ठेवली. या पराभवामुळे पनामाचे स्पर्धेतील आव्हान संपले असून, त्यांना अद्याप विश्वचषकात पहिल्या गुणाची प्रतीक्षा आहे. 'ग्रुप एल'मधील बाद फेरीचे चित्र शनिवारी स्पष्ट होईल. सध्या इंग्लंड आणि घाना प्रत्येकी चार गुणांसह आघाडीवर आहेत. शनिवारी इंग्लंडचा सामना पनामाशी, तर क्रोएशियाचा सामना घानाशी होणार आहे. त्यामुळे या गटातून सर्वांना अद्याप अग्रस्थानासह आगेकूच करण्याची संधी आहे.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल