FIFA World Cup 2026 : इजिप्तचा ऑस्ट्रेलियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ ने विजय; निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी (Photo-X)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : इजिप्तचा ऑस्ट्रेलियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ ने विजय; निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत पदार्पण करणाऱ्या इजिप्तने रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला.

Swapnil S

आर्लिंग्टन (एपी): विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत पदार्पण करणाऱ्या इजिप्तने रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला.

निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते. पेनल्टी शूटआऊटमध्ये होसाम अब्देलमगुइदने इजिप्तसाठी निर्णायक गोल केला. इजिप्तचा हा चौथ्या विश्वचषकातील बाद फेरीतील पहिलाच विजय आहे, तर ऑस्ट्रेलियाचा बाद फेरीतील पराभवाचा रेकॉर्ड ०-३ असा झाला आहे. इजिप्तचा पुढील सामना मंगळवारी अटलांटा येथे अंतिम १६ च्या फेरीत गतविजेत्या अर्जेंटिनाशी होईल.

शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या हॅरी सुतारने पहिलीच संधी गमावली, तर १८ वर्षीय लुकास हेरिंग्टनचा चौथा प्रयत्न गोलपोस्टच्या क्रॉसबारला लागून अपयशी ठरला, ज्यामुळे अब्देलमगुइदला सामना जिंकवून देण्याची संधी मिळाली. इजिप्तकडून महमूद साबेर, रॅमी राबिया आणि 'लिव्हरपूल' चा माजी स्टार मोहम्मद सालाह यांनी पेनल्टीवर गोल केले.

सालाह हा शेवटच्या गटसामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतरही या सामन्यात खेळला. ऑस्ट्रेलियाकडून जॅक्सन इर्विन आणि अवार माबिल यांनी शूटआऊटमध्ये गोल केले. अतिरिक्त वेळेच्या शेवटच्या मिळाली. टप्प्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचा गोलरक्षक पॅट्रिक बीचच्या जागी ३४ वर्षीय अनुभवी मॅथ्यू रायनला मैदानात उतरवले होते, परंतु तो इजिप्तच्या चारपैकी एकही शॉट रोखू शकला नाही. रायनचा हा १०५ वा आंतरराष्ट्रीय सामना होता, तर २२ वर्षीय बीच केवळ आपला सहावा सामना खेळत होता आणि त्याने सामन्यात अनेक उत्कृष्ट बचाव केले होते.

यापूर्वी निर्धारित वेळेत सामन्याच्या १३ व्या मिनिटाला इमाम अशूरने हेडरद्वारे गोल करून इजिप्तला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, ५५ व्या मिनिटाला इजिप्तचा बचावपटू मोहम्मद हानी याने आत्मघातकी गोल केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने १-१ अशी बरोबरी साधली. यासह हानी हा एकाच विश्वचषकात दोन आत्मघातकी गोल करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

एडन ओनीलने घेतलेल्या फ्री किकवर हानीने हेडरद्वारे चेंडू स्वतःचाच गोलरक्षक मोस्तफा शुबीरच्या पाठीमागे पाठवला. हानीने यापूर्वी गट फेरीत बेल्जियमविरुद्धच्या १-१ अशा बरोबरीच्या सामन्यातही आत्मघातकी गोल केला होता. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला ओमर मरमुशला इजिप्तची आघाडी दुप्पट करण्याची संधी मिळाली होती, पण त्याचा शॉट चुकला. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये बीचने राबिया आणि सालाहचे प्रयत्न हाणून पाडले, तर ऑस्ट्रेलियाच्या सुतारने गुडघ्याने हँसेम हसनचा शॉट रोखला होता.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान