FIFA World Cup 2026 : आफ्रिकेतील सात संघ विश्वचषकाबाहेर 
क्रीडा

FIFA World Cup 2026 : आफ्रिकेतील सात संघ विश्वचषकाबाहेर

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आफ्रिकन देशांच्या ऐतिहासिक मोहिमेला मोठा धक्का बसला असून बाद फेरीत पोहोचलेल्या नऊपैकी सात संघ पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

Swapnil S

कन्सास सिटी: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आफ्रिकन देशांच्या ऐतिहासिक मोहिमेला मोठा धक्का बसला असून बाद फेरीत पोहोचलेल्या नऊपैकी सात संघ पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. शुक्रवारी रात्री झालेल्या अटीतटीच्या सामन्यात घानाचा कोलंबियाकडून १-० असा पराभव झाला. या पराभवासह घानाचे ३२ संघांच्या फेरीतील आव्हान संपुष्टात आले असून आता आफ्रिका खंडाच्या आशा केवळ मोरोक्को आणि इजिप्त या दोन संघांवर अवलंबून आहेत.

मोरोक्कोचा सामना शनिवारी हॉस्टन येथे कॅनडाविरुद्ध होणार आहे, तर इजिप्तने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. इजिप्तचा पुढील सामना मंगळवारी अटलांटा येथे लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाशी होईल. अर्जेंटिनाने शुक्रवारीच केप व्हर्डेचा ३-२ असा पराभव करून आगेकूच केली आहे.

घानाचा फॉरवर्ड ब्रँडन थॉमस-असांते याने यापूर्वी सांगितले होते की, प्रदीर्घ काळापासून प्रमुख स्पर्धांमध्ये आफ्रिकन देशांच्या आक्रमणात क्षमतेबद्दल शंका घेतली जात होती, परंतु या यशाने आफ्रिकेत किती प्रतिभा आहे, हे सिद्ध झाले आहे. मात्र, घानाचा संघ कोलंबियाविरुद्ध अपयशी ठरला. या स्पर्धेत आफ्रिकेच्या इतर संघांनीही चांगली झुंज दिली परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.

काँगोचा संघ इंग्लंडविरुद्ध बहुतांश वेळ आघाडीवर होता, मात्र हॅरी केनने लागोपाठ दोन गोल करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. सेनेगलला बेल्जियमविरुद्ध अतिरिक्त वेळेत पराभवाचा सामना करावा लागला. आयव्हरी कोस्टने नॉर्वेविरुद्ध ८६ व्या मिनिटापर्यंत बरोबरी राखली होती, परंतु एर्लिंग हालंडच्या गोलमुळे नॉर्वेने विजय मिळवला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेला कॅनडाकडून आणि अल्जेरियाला स्वित्झर्लंडकडून पराभव पत्करावा लागला.

काँगोचे प्रशिक्षक सेबॅस्टियन देसाब्रे यांनी सांगितले की, ३२ संघांच्या फेरीत आफ्रिकेचे नऊ संघ पात्र ठरणे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अल्जेरियाचे प्रशिक्षक व्लादिमीर पेटकोविच यांनी नमूद केले की, या विश्वचषकात कागदावर मजबूत असलेले संघच जिंकतील याची खात्री देता येत नाही आणि याचे अनेक दाखले मिळाले आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान