FIFA World Cup 2026 : यजमान मेक्सिकोची शानदार विजयी हॅटट्रिक (Photo -X)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : यजमान मेक्सिकोची शानदार विजयी हॅटट्रिक

यजमान मेक्सिकोने फिफा विश्वचषकात प्रथमच साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकण्याचा पराक्रम केला.

Swapnil S

मेक्सिको सिटी : यजमान मेक्सिकोने फिफा विश्वचषकात प्रथमच साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी गुरुवारी अ-गटातून अग्रस्थानासह बाद फेरी गाठताना चेक प्रजासत्ताकचा ३-० असा फडशा पाडला. चेक संघाचे आव्हान मात्र ३ सामन्यांतील फक्त एका गुणामुळे संपुष्टात आले आहे.

मेक्सिको सिटी येथे झालेल्या या सामन्याच्या उत्तरार्धात ५५व्या मिनिटाला २२ वर्षीय मातेओ चावेझने गोल करत मेक्सिकोचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांच्या अंतरात, ६१व्या मिनिटाला ज्युलियन क्विनोनेसने गोल करत संघाची आघाडी २-० अशी दुप्पट केली. सामन्याच्या निर्धारित वेळेनंतर मिळालेल्या अतिरिक्त वेळेत अल्वारो फिदाल्गोने तिसरा गोल नोंदवून मेक्सिकोचा विजय निश्चित केला.

या ऐतिहासिक विजयासोबतच सामन्यात काही विशेष विक्रमही नोंदवले गेले. मेक्सिकोचा १७ वर्षीय खेळाडू गिल्बर्टो मोरा विश्वचषकात सुरुवात करणारा मेक्सिकोचा सर्वात तरुण खेळाडू ठरला. तसेच, ४० वर्षीय गोलरक्षक गुलेर्मो ओचोआ ७७ व्या मिनिटाला मैदानात उतरला. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यानंतर सहा विश्वचषकात खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.

मेक्सिकोचे मुख्य प्रशिक्षक हावियर अगीरे यांनी विजयानंतर सांगितले की, बाद फेरीतील आव्हाने कठीण असतात आणि आता साखळी फेरीतील आकडेवारीला महत्त्व नाही. आम्हाला आता पुढील सामन्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

मेक्सिकोच्या चाहत्यांनी या विजयाचा जल्लोष केला असला, तरी चाहत्यांकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह घोषणेमुळे फेडरेशनवर कारवाईची टांगती तलवार आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल