फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : झ्वेरेव्हची ग्रँडस्लॅम स्वप्नपूर्ती (Photo-X)
क्रीडा

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : झ्वेरेव्हची ग्रँडस्लॅम स्वप्नपूर्ती

जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने अखेर आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित झ्वेरेव्हने इटलीच्या फ्लेव्हिओ कोबोलीचा ६-१, ४-६, ६-४, ६-७, ६-१ असा पराभव केला.

Swapnil S

पॅरिस : जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने अखेर आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित झ्वेरेव्हने इटलीच्या फ्लेव्हिओ कोबोलीचा ६-१, ४-६, ६-४, ६-७, ६-१ असा पराभव केला. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या पाच सेटच्या थरारक लढतीनंतर झ्वेरेव्हने क्ले कोर्टवर जेतेपदावर नाव कोरले.

या विजयासह झ्वेरेव्हने कारकीर्दीतील २५ वे जेतेपद मिळवले असून, तो ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. दुसऱ्या चॅम्पियनशिप पॉईंटवर कोबोलीची ओव्हरहेड शॉटची संधी हुकली आणि झ्वेरेव्हने मैदानातच पाठीवर झोकून देत डोळे झाकून अश्रूंना वाट करून दिली.

या स्पर्धेत जॅनिक सिनर आणि कार्लोस अल्काराझ यांच्यासारखे बलाढ्य खेळाडू समोर नसण्याचा पूर्ण फायदा झ्वेरेव्हने घेतला. पहिल्या आठवड्यातील उष्णतेच्या लाटेत अव्वल मानांकित सिनरचा खेळ खालावला होता आणि दुसऱ्या फेरीत जुआन मॅन्युएल करुंडोलोविरुद्ध दोन सेट आणि ५-१ अशी आघाडी गमावल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर २४ वेळचा ग्रँड स्लॅम विजेता नोव्हाक जोकोविचही स्पर्धेतून बाहेर पडला, तर दोन वेळचा गतविजेता अल्काराझने मनगटाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. झ्वेरेव्हने यापूर्वी २०२४ च्या फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत अल्काराझविरुद्ध दोन सेटची आघाडी गमावली होती, तर २०२०च्या अमेरिकन ओपन फायनलमध्ये डॉमिनिक थिएमकडून आणि २०२५च्या ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम फेरीत सिनरकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. चौथ्या प्रयत्नात पहिले ग्रँडस्लॅम जिंकून तो आंद्रे आगासी, गोराण इव्हानिसेविच आणि डॉमिनिक थिएम यांच्या पंक्तीत सहभागी झाला आहे.

दुसऱ्या बाजूला १४व्या मानांकित फ्लेव्हिओ कोबोलीने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची फायनल गाठली होती. तो ५० वर्षांनंतर फ्रेंच ओपन जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू बनण्यासाठी प्रयत्नशील होता. रो मधील ज्या टेनिस क्लबमधून एड्रियानो पानात्टा आले होते, त्याच क्लबमधून कोबोली पुढे आला आहे. पानात्टा यांच्या १९७६ मधील ऐतिहासिक विजयाच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांना विजेत्याला कप देण्यास आमंत्रित करण्यात आले होते, परंतु हा बहुमान झ्वेरेव्हला मिळाला.

सामन्याच्या सुरुवातीला हवामान उत्तम होते आणि झवेरेव्हने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. शनिवारी रशियन नवोदित खेळाडू मीरा आंद्रेएवाने महिला एकेरीचे जेतेपद पटकावले होते.

मे महिन्यात ईव्ही विक्रीचा नवा विक्रम; देशात विजेवरील वाहनांच्या लोकप्रियतेत वाढ

ठाणे मनपाच्या शहर विकास विभागाला आग; महत्त्वाची कागदपत्रे खाक, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai : फ्लेमिंगो अभयक्षेत्राबाबत राज्य खारफुटी कक्षाकडून पाहणीचे आदेश; डीपीएस तलावाजवळ उंच इमारतींचा धोका

बाष्पीभवनाने जळगावमधील धरणातील पाणीसाठ्यात घट; जिल्हावासीयांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

किल्ले राजकोट येथे ‘लेझर अँड साऊंड शो’; आमदार प्रमोद जठार यांची माहिती