क्रीडा

अधिक विकेट्स घेऊनही टी-२० वर्ल्डकप संघामधून 'हा' खेळाडू बाहेर

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियामध्ये येत्या १६ ऑक्टोबरपासून होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत अनुभवी रवीचंद्रन अश्विनलाही स्थान देण्यात आले असले, तरी अश्विनपेक्षा अधिक विकेट्स घेतलेल्या रवी बिश्नोईला मात्र संघात स्थान मिळू शकले नाही.

फिरकीपटू रवी बिश्नोईने गेल्या टी-२० विश्वचषकापासून ते त्याच्या आतापर्यंतच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अश्विनपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने १० टी-२० सामने खेळले असून १६ विकेट्स मिळविल्या आहेत.

अश्विनने गेल्या टी-२० विश्वचषकापासून ते आतापर्यंत सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ ८ विकेट्स घेतल्या आहेत. बिश्नोई याबाबतीत अश्विनच्या पुढे आहे. असे असूनही त्याला डी-२- विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळू शकले नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

चहल अव्वल

युझवेंद्र चहलची गेल्या टी-२० विश्वचषकापासून ते आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यास अव्वल नंबरवर असल्याचे स्पष्ट होत आहे. या लेगस्पिनरने १७ सामने खेळले असून २० विकेट्स घेतल्या आहेत.

जडेजाच्या जागेवर टी-२० विश्वचषक संघात निवडलेला अक्षर पटेल या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या विश्वचषकापासून पटेलने १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि १२ विकेट्स घेण्यात यश मिळविले.

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, संजय निरुपम यांचा दावा

गँगरेपनंतर तलवारीनं कापली बोटे...बांसवाडा घटनेची हादरवून टाकणारी कहाणी, आरोपींनी गाठला क्रूरतेचा कळस

"नाहीतर देशातील हुकुमशाही सुरुच राहील..."खासदार अरविंद सावंतांची पंतप्रधान मोदींवर टीका

लष्करातील जवानाने EVM मध्ये फेरफार करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले २.५ कोटी!

Auto Sweep Service: बँकेत जाऊन फक्त 'हे' सांगा, बचत खात्यावर मिळेल तिप्पट व्याज