Photo : X
क्रीडा

ICC २०२७ पुरुष विश्वचषक स्पर्धा : दक्षिण आफ्रिकेत ४४ सामने होणार

आयसीसी २०२७चा पुरुष विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे, तर सहयजमान पद झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांकडे आहे. स्पर्धेतील ४४ सामने एकट्या दक्षिण आफ्रिकेत होणार असून उर्वरित १० सामने हे झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांत होणार असल्याचे ट्रेवर मॅन्युअल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या स्पर्धेच्या आयोजन समिती बोर्डाने (एलओसीबी) केले.

Swapnil S

नवी दिल्ली : आयसीसी २०२७चा पुरुष विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे, तर सहयजमान पद झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांकडे आहे. स्पर्धेतील ४४ सामने एकट्या दक्षिण आफ्रिकेत होणार असून उर्वरित १० सामने हे झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांत होणार असल्याचे ट्रेवर मॅन्युअल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या स्पर्धेच्या आयोजन समिती बोर्डाने (एलओसीबी) केले. तसेच यावेळी दक्षिण आफ्रिकेतील यजमान शहरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रिहान रिचर्ड्स यांनी सांगितले की, दोन दशकांपेक्षा जास्त काळानंतर विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत होत आहे, याचे विशेष महत्त्व आहे. २४ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा झाली होती. त्यामुळे २०२७ चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेसाठी खास आहे. या स्पर्धेत नव्या चाहत्यांना टीव्हीसमोर खिळवून ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे रिचर्ड्स म्हणाले.

आयोजित केंद्रित रिहान रिचर्ड्स यावेळी म्हणाले की, २०२७ चा विश्वचषक हा खेळाबरोबरच क्रिकेटच्या विस्तारावरही लक्ष करेल. झिम्बाब्वे, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेत सामने करताना क्रिकेटसोबत येथील सांस्कृतिक संपन्नतेचेही दर्शन घडेल, असे रिहान रिचर्ड्स म्हणाले.

२०२७ च्या पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे आहे, तर झिम्बाब्वे आणि नामिबिया हे या स्पर्धेचे सहयजमान आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२७मध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत

एकूण १४ संघ भाग घेतील आणि एकूण ५४ सामने खेळले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत ८ शहरांमध्ये ४४ सामने होतील, तर झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये उर्वरित १० सामने खेळले जातील. दक्षिण आफ्रिकेतील ८ शहरांत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी संघ तयारी करत आहेत.

येथे होणार सामने

दक्षिण आफ्रिकेतील जोहानबर्ग, प्रिटोरिया, केपटाऊन, डर्बन, गक्वेबेरहा, ब्लूमफॉन्टेन, इस्ट लंडन आणि पार्ल या शहरांत हे सामने होणार आहेत. तसेच झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश या स्पर्धेच सहयजमान देश आहेत.

मराठा आरक्षणाची ही शेवटची लढाई! मनोज जरांगे यांचा इशारा

जलवाहतुकीचा मुहूर्त हुकला; मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा लाबणीवर

‘लाडकी बहीण’ योजनेतून अपात्रांनी स्वेच्छेने नावे रद्द करावीत; मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

तानाजी सावंत यांचे पुनर्वसन? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत घेतली भेट

E20 मुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत २-५ टक्के घट शक्य; कार तज्ज्ञांचा दावा