क्रीडा

ICC T20 World Cup 2026 : ब्रूकचे शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत

कर्णधार हॅरी ब्रूकने (५१ चेंडूंत १०० धावा) मंगळवारी शानदार शतक झळकावले. त्यामुळे इंग्लंडने टी-२० विश्वचषकातील सुपर-आठ फेरीच्या दुसऱ्या गटात पाकिस्तानला २ गडी व ५ चेंडू राखून पराभूत केले. सलग दुसऱ्या विजयासह इंग्लंडने सर्वप्रथम उपांत्य फेरीत धडक मारली. सलग पाचव्या टी-२० विश्वचषकात त्यांनी किमान उपांत्य फेरी गाठली आहे, हे विशेष.

Swapnil S

पाल्लेकेले : कर्णधार हॅरी ब्रूकने (५१ चेंडूंत १०० धावा) मंगळवारी शानदार शतक झळकावले. त्यामुळे इंग्लंडने टी-२० विश्वचषकातील सुपर-आठ फेरीच्या दुसऱ्या गटात पाकिस्तानला २ गडी व ५ चेंडू राखून पराभूत केले. सलग दुसऱ्या विजयासह इंग्लंडने सर्वप्रथम उपांत्य फेरीत धडक मारली. सलग पाचव्या टी-२० विश्वचषकात त्यांनी किमान उपांत्य फेरी गाठली आहे, हे विशेष.

पाल्लेकेले येथे झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ९ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. साहिबझादा फरहानने ४५ चेंडूंत ६३ धावा फटकावल्या. मात्र बाबर आझम (२५), फखर झमान (२५), शादाब खान (२३) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. फिरकीपटू लियाम डॉसनने ३ बळी मिळवले.

त्यानंतर ब्रूकने १० चौकार व ४ षटकारांसह ऐतिहासिक शतक साकारले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात शतक झळकावणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. फिल सॉल्ट (०) व जोस बटलर (२) स्वस्तात माघारी परतल्यावरही ब्रूकने धडाका कायम राखला. तसेच जेकब बेथल (८), टॉम बँटन (२) यांनीही निराशा केली. ४ बाद ५८ वरून ब्रूक व सॅम करन (१६) यांनी डोलारा सावरला. मग जॅक्सनेही २८ धावा केल्या.

ब्रूक बाद झाल्यावर काहीसा डाव घसरला. मात्र जोफ्रा आर्चरने ६ चेंडूंत ३ धावांची गरज असताना चौकार लगावून विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे इंग्लंडचे २ सामन्यांत ४ गुण आहेत. तर पाकिस्तान २ सामन्यांत फक्त १ गुणावर आहे.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही २० संघ सहभागी होते.

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा ओलांडल्या! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद