न्यूझीलंडचा शानदार विजय; श्रीलंकेचे पॅकअप Photo : X
क्रीडा

NZ vs SL, ICC T20 World Cup 2026 : न्यूझीलंडचा शानदार विजय; श्रीलंकेचे पॅकअप

टी-२० विश्वचषकात बुधवारी न्यूझीलंडने यजमान श्रीलंकेचा ६१ धावांनी पराभव करून सुपर-आठ फेरीत शानदार विजय नोंदवला. या विजयामुळे न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. मात्र सलग दुसऱ्या पराभवामुळे श्रीलंकेला गाशा गुंडाळावा लागला आहे. ३२ धावा करण्यासह डावखुऱ्या फिरकीद्वारे ४ बळी मिळवणारा रचिन रवींद्र न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Swapnil S

कोलंबो : टी-२० विश्वचषकात बुधवारी न्यूझीलंडने यजमान श्रीलंकेचा ६१ धावांनी पराभव करून सुपर-आठ फेरीत शानदार विजय नोंदवला. या विजयामुळे न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. मात्र सलग दुसऱ्या पराभवामुळे श्रीलंकेला गाशा गुंडाळावा लागला आहे. ३२ धावा करण्यासह डावखुऱ्या फिरकीद्वारे ४ बळी मिळवणारा रचिन रवींद्र न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १६८ धावांपर्यंत मजल मारली. मुख्य म्हणजे एकवेळ ते ६ बाद ८४ अशा संकटात होते. मात्र कर्णधार मिचेल सँटनर (२६ चेंडूंत ४७ धावा) आणि कोल मॅकोन्ची (२३ चेंडूंत नाबाद ३१) यांनी सातव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचून किवी संघाला दीडशे धावांपलीकडे नेले. रचिन रवींद्र (३२), फिन (२३) यांनीही उपयुक्त योगदान दिले. श्रीलंकेसाठी महीष थिक्षणा व दुश्मंता चमीरा यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २० षटकांत ८ बाद १०७ धावांपर्यंतच पोहचू शकला. पहिल्याच षटकात पथुम निसांका शून्यावर बाद झाला व श्रीलंकेचा डाव घसरला. पॉवरप्लेमध्ये त्यांना २० धावाच करता आल्या. रवींद्रने मग मधल्या फळीला गुंडाळताना कर्णधार दसुन शनका (३), पवन रत्ननायके (१०), कुशल मेंडिस (११) यांचे बळी मिळवले. कामिंदू मेंडिस (३१) व दुनिथ वेल्लालागे (२९) यांनी काहीसा प्रतिकार केला. मात्र धावगती वाढत गेली व फिरकीपटू वर्चस्व मिळवत गेल्याने श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले.

सुपर-आठ फेरीच्या दुसऱ्या गटातून इंग्लंडने उपांत्य फेरी गाठलेली आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात चुरस असेल. न्यूझीलंड सध्या ३ गुणांसह दुसऱ्या, तर पाकिस्तान १ गुणासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल