न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव Photo : PTI
क्रीडा

IND vs NZ 4th T20 match : न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव

न्यूझीलंड संघाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताला ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २१५ धावा केल्या. मात्र शिवम दुबेच्या (२३ चेंडूंत ६५ धावा) अर्धशतकानंतरही भारताचा संघ १८.४ षटकांत १६५ धावांत गारद झाला.

Swapnil S

विशाखापट्टणम : न्यूझीलंड संघाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताला ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २१५ धावा केल्या. मात्र शिवम दुबेच्या (२३ चेंडूंत ६५ धावा) अर्धशतकानंतरही भारताचा संघ १८.४ षटकांत १६५ धावांत गारद झाला. मालिकेत भारताकडे ३-१ अशी आघाडी असून शनिवारी पाचवा सामना खेळवण्यात येईल.

मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता ‌अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका ही भारतासाठी एकप्रकारे विश्वचषकाची पूर्वपरीक्षा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत नुकताच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली. आता लक्ष पूर्णपणे टी-२० सामन्यांकडे वळले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच लढतींनंतर ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

दरम्यान, भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. भारताने अनुक्रमे नागपूर, रायपूर, गुवाहाटी येथे झालेल्या लढतींमध्ये किवी संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवून आधीच आघाडी घेतली.

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

मल्ल्याचे ८७५१ कोटी कर्ज फेडणे बाकी; SBI चे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

MPSC आंदोलनात फूट? पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, विद्यार्थ्यांमध्येही मतभेद

डेव्हिड हेडलीची साक्ष भारतासाठी ठरली 'मास्टरस्ट्रोक'; उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट