@ICC
@ICC
क्रीडा

IND vs NZ ODI : टीम इंडियाच्या विजयावर पावसाचे पाणी; दुसरा एकदिवसीय सामना रद्द

प्रतिनिधी

रविवारी हॅमिल्टन येथे खेळवला जाणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ ODI) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. अशामध्ये आता भारतीय संघाच्या एकदिवसीय मालिका विजयाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. भारत ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० असा मागे असून आता पुढचा सामना भारताने जिंकल्यास मालिका बरोबरीत निघू शकते.

नाणेफेक झाल्यानंतर भारतीय संघ हा प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. ५ ओव्हर्सचा खेळ झाला आणि पावसाळा सुरुवात झाली. त्यानंतर बऱ्याच वेळा सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आणि हा सामना २९ ओव्हर्सचा खेळवण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच भारतीय कर्णधार शिखर धवन हा अवघ्या ३ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि गिल यांनी भारताची बाजू सावरत शानदार फटकेबाजी केली.

गिलने ४२ चेंडूंमध्ये ४५ धावा तर सूर्यकुमारने २५ चेंडूत ३४ धाव केल्या. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ चेंडूत ६६ धावांची भागीदारी केली. १३व्या ओव्हरपर्यंत भारतीय संघाने १ विकेट गमावत ८९ धावांची खेळी केली होती. मात्र, त्यांनतर पुन्हा एकदा जोरदार पावसाळा सुरुवात झाली आणि पुन्हा खेळ थांबवण्यात आला. निश्चित वेळेपर्यंत सामना पुन्हा सुरु होणे शक्य नसल्याने पंचांनी दोन्ही कर्णधारांशी संवाद साधत हा सामना रद्द झाल्याची घोषणा केली. आता पुढचा एकदिवसीय सामना क्राईस्टचर्चच्या मैदानात होणार आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघाने जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

‘क्राऊड पुलर’ नरेंद्र मोदी

रेवण्णांच्या निमित्ताने नवी शोषणगाथा

पाकव्याप्त काश्मीर स्वत:हून भारतात विलीन होईल! राजनाथ सिंह यांचा दावा; बळाचा वापर गरजेचा नाही

करकरेंवर संघाशी संबंधित पोलिसाने केला गोळीबार,वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ!

अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन