ज्युनिअर आशियाई चषक पुरुष हॉकी स्पर्धा : भारताचा इंडोनेशियावर १४-० ने दणदणीत विजय; प्रभदीप सिंगचे पाच गोल  (Photo-X/@TheHockeyIndia)
क्रीडा

ज्युनिअर आशियाई चषक पुरुष हॉकी स्पर्धा : भारताचा इंडोनेशियावर १४-० ने दणदणीत विजय; प्रभदीप सिंगचे पाच गोल

'एएचएफ ज्युनिअर पुरुष आशियाई चषक' हॉकी स्पर्धेत पाचवेळच्या विजेत्या भारतीय संघाने आपल्या जेतेपदाच्या मोहिमेची दणदणीत सुरुवात केली आहे.

Swapnil S

मोकी, चीन : 'एएचएफ ज्युनिअर पुरुष आशियाई चषक' हॉकी स्पर्धेत पाचवेळच्या विजेत्या भारतीय संघाने आपल्या जेतेपदाच्या मोहिमेची दणदणीत सुरुवात केली आहे. शनिवारी झालेल्या अ गटातील पहिल्याच सामन्यात भारताने इंडोनेशियाचा १४-० असा पुरता धुव्वा उडवला.

भारताच्या या एकतर्फी विजयात कर्णधार अनमोल एक्का, प्रभदीप सिंग आणि अजित यादव यांनी मिळून १२ गोल लगावले. भारतीय संघाने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ करत इंडोनेशियाच्या गोलपोस्टवर सातत्याने हल्ले चढवले. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला प्रभदीप सिंगने मैदानी गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर आठव्या मिनिटाला हरपालने गोल करत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. दुसऱ्या सत्रात १६ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर कर्णधार अनमोल एक्काने पहिला गोल केला.

आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि भारताला मध्यंतरापर्यंत ६-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. २० व्या मिनिटाला अजित यादवने गोल करत धावसंख्या ४-० केली. यानंतर प्रभदीप सिंगने २६ व्या आणि ३० व्या मिनिटाला सलग गोल करत दिली.

उत्तरार्धातही भारतीय खेळाडूंचे वर्चस्व कायम राहिले. ३५ व्या आणि ४२ व्या मिनिटाला अनमोलने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. तिसऱ्या सत्राच्या शेवटी प्रभदीपने आणखी एक गोल नोंदवल्याने भारताची आघाडी ९-० झाली. चौथ्या आणि अंतिम सत्रात भारतीय आक्रमकांनी गोलची खैरात करत आणखी ५ गोल डागले. ५१ व्या मिनिटाला अनमोलने सामन्यातील आपला चौथा गोल केला, तर ५२ व्या मिनिटाला प्रभदीपने वैयक्तिक पाचवा गोल नोंदवला.

५३ व्या मिनिटाला अजितने एकाच मिनिटात दोन गोल करत आपली हॅटट्रिक साजरी केली आणि धावसंख्या १३-० वर पोहोचवली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय