श्रीलंकेत होणारा आशिया चषक हा पावसामुळे रखडला गेला आहे. अतिपावसामुळे आशिया कप मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला होता. आता या सामन्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोलंबो येथील पावसामुळे एशियन क्रिकेट काउंसीलने मोठा निर्णय घेतला आहे. १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) म्हटलं आहे की, 10 सप्टेंबर 2023 रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 11 आशिया चषक 2023 सुपर-4 सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर प्रतिकूल हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना, 11 सप्टेंबर 2023 रोजी तो स्थगित केल्यापासून सुरू राहील. अशा परिस्थितीत, सामन्याची तिकीटे ज्यांनी विकत घेतली आहेत. त्यांनी ती तिकिटे सांभाळून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सामन्याची ही तिकटे दुसऱ्या दिवशी देखील वैध राहतील, असंही सांगण्यात आलं आहे.
10 तारखेला होणारा भारत पाकिस्तान हा सामना पूर्ण झाला नाही. तर हा सामना 11 सप्टेंबरला पूर्ण होईल. या परिस्थितीत भारतीय संघाला दोन सामने लागोपाठ खेळावे लागणार आहेत. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भारताचे 12 सप्टेंबरला बांग्लादेशविरोधात सामना आहे. सुपर चार मध्ये केवळ भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठीच रिझर्व्ह डे ठेवला गेला आहे. याशिवाय इतर कोणताही सामना जर पावसात वाहून गेला तर तो सामना रद्द केला जाईल. भारत-पाक सामन्याशिवाय फक्त आशिया कपच्या फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे असणार आहे.
आशिया कप 2023 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा आमनेसामने आले. तेव्हा या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. पल्लेकेली येथे झालेल्या या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 266 धावा पूर्ण केल्या होत्या. यानंतर पाऊस आल्याने पाकिस्तानला एकही ओव्हर बॅटिंग करण्याची संधी मिळाली नव्हती. 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांमध्ये पुन्हा एकदा सामान होणार आहे. या सामन्यावर देखील पावसाचं संकट आलं आहे. सामन्यादरम्यान कोलंबो येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुशे एसीसीने रिझर्व्ह डे ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. सामान चालू असताना पाऊस येण्याची शक्यता 90 टक्के सांगितली जात आहे.