Asian Games 2026 : भारताची अंतिम फेरीत धडक; शफाली वर्माचे धडाकेबाज शतक (Photo-X)
क्रीडा

Asian Games 2026 : भारताची अंतिम फेरीत धडक; शफाली वर्माचे धडाकेबाज शतक

आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० क्रिकेटच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Swapnil S

निशिन : आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० क्रिकेटच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने बांगलादेशचा ११४ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला सलामीवीर शफाली वर्माने तुफानी सुरुवात करून दिली. शफालीने अवघ्या ४९ चेंडूंत ९ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०० धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील तिचे हे पहिलेच शतक ठरले. तिच्या या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभारला. तिला स्मृती मानधना (३७ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (४० धावा) यांनी उत्तम साथ दिली. शफाली आणि मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.

१९६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १५.४ षटकांत अवघ्या ८१ धावांत गारद झाला. भारताकडून नंदनी शर्माने ३ बळी टिपले. बांगलादेशकडून दिलारा अक्टरने सर्वाधिक २३ चेंडूंत २७ धावा केल्या.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

हरित लवादाचे मोदी सरकारकडून खच्चीकरण; काँग्रेसचा आरोप, उद्योगांच्या बाजूने निकाल होत असल्याची तक्रार