हार्दिक, पंतची प्रतीक्षा कायम; नमन, नबीला प्रथमच संधी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारताचे संघ जाहीर (Photo-X)
क्रीडा

हार्दिक, पंतची प्रतीक्षा कायम; नमन, नबीला प्रथमच संधी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी भारताचे संघ जाहीर

अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांचे भारताच्या एकदिवसीय संघातील पुनरागमन विविध कारणांमुळे आणखी लांबले आहे.

Swapnil S

मुंबई : अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांचे भारताच्या एकदिवसीय संघातील पुनरागमन विविध कारणांमुळे आणखी लांबले आहे. पंजाबचा अष्टपैलू नमन धीरला प्रथमच भारताच्या संघात स्थान लाभले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी गुरुवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. याचवेळी इराणी चषकासाठी शेष भारत व आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा सुधारित संघही घोषित करण्यात आला. एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित-विराटला एकत्रित खेळताना पाहायला मिळेल.

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीलासुद्धा आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात प्रथमच स्थान मिळाले आहे. २७ सप्टेंबरपासून तिरुवनंतपुरम येथे ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार असून त्यानंतर भारत-वेस्ट इंडिज यांच्यात ५ टी-२० लढतीदेखील होतील. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत के. एल. राहुल उपकर्णधार असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत २८ सप्टेंबरपासून भारतीय पुरुष संघ टी-२० सामने खेळणार असल्याने श्रेयस तेथे भारताचे नेतृत्व करण्यात व्यस्त असेल.

दरम्यान, हार्दिक २० सप्टेंबरपर्यंत तंदुरुस्त होणे अपेक्षित असले, तरी भारत-अ संघासाठी १० षटके गोलंदाजी करून तंदुरुस्ती सिद्ध केल्याशिवाय त्याची निवड न करण्याचा निर्णय राष्ट्रीय निवड समितीने घेतला आहे. वेस्ट इंडिज मालिकेसाठी हार्दिकच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज-अष्टपैलूचा पर्याय म्हणून नितीश रेड्डीला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून काढून एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आले आहे. हार्दिकचा उत्तराधिकारी म्हणून नितीशकडे पाहिले जात आहे.

पंतच्या बाबतीत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या कौशल्याचा योग्य वापर न झाल्याचे मत संघ व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे. मात्र इराणी चषकासाठी पंतकडे शेष भारत संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून सर्फराझ खान उपकर्णधार असेल. १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान श्रीनगर येथे इराणी चषकासाठी शेष भारत संघ रणजी चषक विजेत्या जम्मू आणि काश्मीरविरुद्ध दोन हात करणार आहे.

इराणी चषकासाठी शेष भारत संघ

ऋषभ पंत (कर्णधार), सनत सांगवान, शिखर मोहन, सुदीप घरामी, सर्फराझ खान, स्मरण रविचंद्रन, मानव सुथार, सारांश जैन, आकाश दीप (तंदुरुस्ती चाचणीनंतर), मुकेश कुमार, मुकेश चौधरी, आर्यन जुयाल, आर्यन पांडे, अनुकूल रॉय, आयुष डोसेजा.

आशियाई स्पर्धेसाठी सुधारित पुरुष संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, यश ठाकूर, विपराज निगम.

एकदिवसीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, के. एल. राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गुर्नूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जैस्वाल, नमन धीर.

टी-२० संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव.

वेस्ट इंडिजविरुद्धचे वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना : रविवार, २७ सप्टेंबर (तिरुवनंतपुरम)

दुसरा एकदिवसीय सामना : बुधवार, ३० सप्टेंबर (गुवाहाटी)

तिसरा एकदिवसीय सामना : शनिवार, ३ ऑक्टोबर (मुल्लानपूर)

  • पहिली टी-२० लढत : मंगळवार, ६ ऑक्टोबर (लखनऊ)

  • दुसरी टी-२० लढत : शुक्रवार, ९ ऑक्टोबर (रांची)

  • तिसरी टी-२० लढत : रविवार, ११ ऑक्टोबर (इंदूर)

  • चौथी टी-२० लढत : बुधवार, १४ ऑक्टोबर (हैदराबाद)

  • पाचवी टी-२० लढत : शनिवार, १७ ऑक्टोबर (बेंगळुरू)

एकदिवसीय सामने दुपारी २ वाजता, टी-२० लढती सायंकाळी ७ वाजल्यापासून

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पेट्रोलपंप चालकांचा ‘यूपीआय बंद’चा इशारा; २ हजारांवरील व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळण्याची मागणी

Mira-Bhayandar : मेहतांच्या कंपनीची बांधकाम परवानगी रद्द; अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार याची चर्चा

Mumbai : दहिसरमध्ये बेकायदा दुकाने तोडली; शिव वल्लभ रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई

डीजीपींच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास केवळ ‘सौम्य शिक्षा’?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

उपोषण मागे! सरकारशी चर्चेनंतर मनोज जरांगेंचा निर्णय; दिली तीन महिन्यांची अंतिम मुदत