भारतावर आयर्लंडकडून पराभवाची नामुष्की; फलंदाजांची हाराकिरी, आयर्लंड ३४ धावांनी विजयी X
क्रीडा

भारत-आयर्लंड टी-२० मालिका : भारतावर आयर्लंडकडून पराभवाची नामुष्की; फलंदाजांची हाराकिरी, आयर्लंड ३४ धावांनी विजयी

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यात धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने आयर्लंडने भारतावर ३४ धावांनी मात केली.

Swapnil S

बेलफास्ट : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यात धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने आयर्लंडने भारतावर ३४ धावांनी मात केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयर्लंडने प्रथमच भारताला धूळ चारली, हे विशेष. श्रेयसच्या नेतृत्वपर्वाचा पराभवाने प्रारंभ झाल्याने अनेकांनी टीका केली आहे. आता आयर्लंडने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून रविवारी दुसरी लढत होईल.

बेलफास्ट येथील या सामन्यात आयर्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १८२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली व १८.५ षटकांत सर्व खेळाडू १४८ धावांवर बाद झाले. अभिषेक शर्माने २० चेंडूंत ४९ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र कर्णधार श्रेयस (३), इशान किशन (१), संजू सॅमसन (५), तिलक वर्मा (१९) व वॉशिंग्टन सुंदर (९) यांनी निराशा केली. शिवम दुबेने १४ चेंडूंत २५ धावांची झुंज दिली. मात्र भारतीय संघ १८.५ षटकांत १४८ धावांत गारद झाला. मॅट हॉलंडने २८ धावांत ३ बळी मिळवले.

आयर्लंडच्या डावात कर्णधार लोरकन टकर याने ३६ चेंडूंत ५० धावांची खेळी केली, ज्यामध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याला गॅरेथ डेलानी याने ३२ चेंडूंत ४९ धावा करून चांगली साथ दिली. भारताकडून वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने सर्वाधिक ३ बळी टिपले, तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अखेरच्या षटकांत सुंदर व प्रसिध कृष्णा यांनी सुमार मारा केला. त्यांनी २ षटकांत ४६ धावा लुटल्या.

या विजयामुळे आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासात या सामन्याची नोंद सुवर्णक्षरांनी झाली असून भारतीय संघाला आता पुढील सामन्यात कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे. वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. शुक्रवारी त्याचा समावेश करण्यात आला नाही.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IPO आक्रसणार; एनएसईसाठी भागधारकांनी घेतली माघार; सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम हुकणार

हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य हे वैश्यवाणीच; नोंदींच्या आधारे जात, वैधता प्रमाणपत्र देणार

पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

Women Asia Cup 2026 : भारतीय महिला संघाचा आज बांगलादेशशी उपांत्य सामना; दुसऱ्या लढतीत पाकिस्तान-श्रीलंका आमनेसामने