निर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज; अफगाणिस्तानविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना; वैभवला संधी मिळण्याची शक्यता 
क्रीडा

निर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज; अफगाणिस्तानविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना; वैभवला संधी मिळण्याची शक्यता

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ गुरुवारी टी-२० मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर भारत-अफगाणिस्तान यांच्यातील तिसरी लढत रंगणार असून भारताने आधीच मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ गुरुवारी टी-२० मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर भारत-अफगाणिस्तान यांच्यातील तिसरी लढत रंगणार असून भारताने आधीच मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे गुरुवारी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीसह इतर राखीव खेळाडूंना संधी मिळू शकते. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होण्यापूर्वी बाकावर बसलेल्या खेळाडूंना मैदानावर वेळ घालवता यावा, यासाठी अंतिम सामन्यात संघात बदल केले जाऊ शकतात, असे संकेत श्रेयसने स्वतः दिले आहेत. संघातील सध्याच्या निवडीवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्यवस्थापन वैभवसाठी सहजासहजी जागा बनवण्याच्या मनस्थितीत नाही. जुलैमध्ये संजू सॅमसन खराब फॉर्ममध्ये असताना इंग्लंड दौऱ्यावर वैभवने पदार्पण केले होते. मात्र, आता सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघेही उत्तम फॉर्ममध्ये आहेत. मंगळवारी दुसऱ्या टी-२० सामन्यात सॅमसनने २२ चेंडूंत ५७ धावांची स्फोटक खेळी केली. हे दोघेही एकाच फॉरमॅटमध्ये नियमित खेळत असल्याने विश्रांती घेण्यास इच्छुक नसतील, त्यामुळे अंतिम निर्णय व्यवस्थापनालाच घ्यावा लागेल.

पर्याय म्हणजे इशान किशनला विश्रांती देणे हा असू शकतो. राष्ट्रीय संघात सामील होण्यापूर्वी किशनने दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाचे वैभवला अंतिम ११ खेळाडूंत स्थान देण्याचा दुसरा नेतृत्व केले होते, तर सॅमसन सध्याच्या मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये अव्वल फळीतील फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे नितीश रेड्डी आणि शिवम दुबे यांना अद्याप फलंदाजीची संधी मिळालेली नाही. तसेच अय्यर आणि तिलक वर्मा यांनाही मैदानावर अधिक वेळ घालवता यावा, असा व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल.

गोलंदाजीचा विचार करता दुखापतीतून सावरलेला नितीश मंगळवारी तीन बळी घेण्यात यशस्वी ठरला, ही संघाच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. दुखापतग्रस्त वरुण चक्रवर्तीच्या जागी खेळणाऱ्या रवी बिश्नोईने दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी केली असून त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांची नवीन चेंडूची जोडी नेहमीप्रमाणेच प्रभावी ठरली आहे. बुमरा उत्तम लयीत दिसत आहे.

दुसऱ्या बाजूला, अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. जर त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली, तर भारताला आव्हान देण्यासाठी किमान २०० धावा उभारणे आवश्यक आहे. मोठ्या संघांना पराभूत करायचे असेल तर २०० पेक्षा जास्त धावा करण्याचा दृष्टिकोन ठेवावा लागेल, असे अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम जादरान याने नमूद केले. त्यामुळे तिसऱ्या लढतीत अफगाणिस्तान झुंज देणार का, हे पहावे लागेल.

दुसऱ्या लढतीत काय घडले?

एकीकडे महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे वातावरण असतानाच मंगळवारी भारताने दिल्लीत सलग दुसरा विजय नोंदवून मालिका खिशात घातली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानला भारताने २० षटकांत ८ बाद १५९ धावांत रोखले. अष्टपैलू नितीश रेड्डीने ३, तर अर्शदीप सिंगने २ बळी मिळवले. जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. इब्राहिम झादरानने सर्वाधिक ३७ धावा केल्या.

त्यानंतर २०२६च्या विश्वचषकातील अंतिम फेरीनंतर प्रथमच अर्धशतक झळकावणाऱ्या सॅमसनने ७ चौकार व ४ षटकारांसह २२ चेंडूंतच ५७ धावा केल्या. अभिषेक शर्माने १९ चेंडूंत ३९ धावा केल्या. त्यामुळे भारताने १४.५ षटकांतच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. नितीश सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण: सोनी टेन ३ आणि फॅनकोड अॅप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

EPFO वेतन मर्यादा आता २५ हजारांपर्यंत

यूजीसीचे नियम कायदा बनणार नाही - मोहन भागवत

पाणी संकटासाठी टंचाई कृती आराखडा; गावांची यादी तयार करण्याची सूचना