भारत-पाकिस्तान महामुकाबला आज; १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
क्रीडा

भारत-पाकिस्तान महामुकाबला आज; १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

IND Vs PAK U19 Asia Cup 2026 : १९ वर्षांखालील एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे.

Swapnil S

अल अमेरात (ओमान) : १९ वर्षांखालील एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. अ गटातील या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताला मागील पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला असल्याने दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

भारताने शुक्रवारी नेपाळचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला. नेपाळने दिलेले १२८ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या १९.१ षटकांत एकही विकेट न गमावता पार केले. दुसरीकडे, यजमान संयुक्त अरब अमिरातीचा पाकिस्तानने नऊ विकेट्सनी पराभव केला. यूएईने दिलेले २२५ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने ३७.३ षटकांत गाठले. साखळी फेरीतील दोन्ही संघांचा हा शेवटच्या आधीचा सामना असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. या विजयामुळे विजेत्या संघाला गटात अव्वल स्थान मिळवण्याची संधी निर्माण होईल. तसेच पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्याच्या दृष्टीनेही हा सामना निर्णायक ठरू शकतो.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही. के. विनीत, यशवर्धन सिंग चौहान, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड, रजत बघेल, व्ही. यशवीर, आर्यन सावसानी, मोहिद उल्वा, काव्या पटेल, शाविन विनोद, इशान सूद.

पाकिस्तान : फरहान युसूफ (कर्णधार), अब्दुल कादिर, अब्दुल सुब्हान, अहमद हुसेन, अली रझा, हमजा जहूर, हसनैन अब्बास दार, हयाम खान, हुजैफा अहसान, जहांगीर बिलाल, मोहम्मद हुजैफा, मोहम्मद सयाम, निकाब शफीक, रिझवानुल्लाह, उस्मान खान.

सामन्याची वेळ : सकाळी १० वाजता.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आजचे राशिभविष्य, ८ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Lakshmi Pujan 2026 Marathi Wishes : लक्ष्मीपूजनानिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा; पाहा सुंदर HD ग्रीटिंग कार्ड्स

Diwali 2026 : यंदा नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी; लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

Diwali Special Recipe : दिवाळी पार्टीसाठी बनवा 'स्पायसी मसाला कोक'; फक्त ५ मिनिटांत तयार होईल टेस्टी ड्रिंक

Diwali Gift Ideas 2026 : दिवाळीत सोनपापडीऐवजी प्रियजनांना द्या 'या' हटके भेटवस्तू; कमी बजेटमध्ये खास सरप्राईज