क्रीडा

गुकेश संयुक्तपणे सहाव्या स्थानी; अमेरिकेच्या लेवॉन अरोनियनची विजेतेपदावर मोहोर

सेंट लुईस रॅपिड आणि स्पर्धेत ब्लिट्झ बुद्धिबळ विश्वविजेता ग्रँडमास्टर भारताच्या डी. गुकेशला संयुक्तपणे सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या लेवॉन अरोनियनने स्पर्धेत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

Swapnil S

सेंट लुईस : सेंट लुईस रॅपिड आणि स्पर्धेत ब्लिट्झ बुद्धिबळ विश्वविजेता ग्रँडमास्टर भारताच्या डी. गुकेशला संयुक्तपणे सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या लेवॉन अरोनियनने स्पर्धेत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

अखेरच्या दिवशी भारताच्या गुकेशने शानदार पुनरागमन केले. त्याने पहिल्या चार डावांतून ३.५ गुण मिळवले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अरोनियन विरुद्ध गुकेशची लढत बरोबरीत सुटली. त्यानंतर गुकेशने शानदार विजय मिळवले. भारताच्या या बुद्धिबळपटूने अमेरिकेच्या शान्कलँड, वेस्ली सो आणि उइबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदीरबेक अब्दुसत्तोरो यांना पराभूत केले. मात्र त्यानंतर गुकेशला कामगिरीत सातत्य राखता आले नाही.

शेवटच्या ५ डावांपैकी गुकेशने २ डाव गमावले, तर ३ डावांत बरोबरी साधली. त्यामुळे त्याच्या खात्यात एकूण गुणांची संख्या १८ झाली.

अमेरिकेच्या फॅबियानो करुआनाने २१.५ गुण घेऊन दुसरे स्थान पटकावले, तर फ्रान्सच्या मॅक्सिम वाचिए-लाग्राव्हने २१ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. अब्दुसत्तारोव्हने २०.५ गुण मिळवून चौथ्या स्थानावर कब्जा केला. वेस्ली सो १९ गुणांसह पाचव्या स्थानी राहिला. भारताचा गुकेश आणि व्हिएतनामच्या ले क्वांग लियेम यांनी संयुक्तपणे सहावे स्थान पटकावले.

ग्रँड चेस टूरमधील शेवटची स्पर्धा असलेली सिंक्वेफील्ड कप बुद्धिबळ स्पर्धा दोन दिवसांत सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारताचे दोन बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. डी. गुकेशसह आर प्रज्ञानंद या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत क्लासिकल चेस नियम लागू होणार आहेत. या प्रकारातील स्पर्धेत गुकेश तगडा खेळाडू मानला जातो. त्यामुळे भारताला या स्पर्धेत विजेतेपद जिंकण्याची संधी आहे.

अरोनियनला सलग दुसरे विजेतेपद

अमेरिकेच्या अरोनियनने स्पर्धेतील अखेरच्या दिवसाची सुरुवात दोन गुणांच्या आघाडीने केली. या दोन फेऱ्यांपूर्वीच त्याने विजेतेपद निश्चित केले होते. त्याने स्पर्धेत एकूण २४.५ गुण मिळवले. अरोनियनसाठी हे सलग दुसरे विजेतेपद ठरले. याआधी ४२ वर्षीय अरोनियनने लास वेगासमध्ये झालेल्या फ्री स्टाईल ग्रँडस्लॅम स्पर्धेत बाजी मारली होती. ही स्पर्धा त्याने सहज जिंकली होती. या विजयासाठी त्याला ४०,००० अमेरिकन डॉलर पारितोषिकरूपी मिळाले होते. त्या स्पर्धेतील एकूण बक्षीस रक्कम १,७५,००० डॉलर होती. अमेरिकेच्या या खेळाडूने सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी केली होती. त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारत स्पर्धेवर वर्चस्व ठेवले होते. अखेर २४.५ गुण मिळवत त्याने या स्पर्धेत बाजी मारली आहे.

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

मुंबईकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी अंधेरी, BKC, धारावीसारख्या महत्त्वाच्या भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; जपून पाणी वापरा - BMC

आंबा, काजू, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यातील महानगरपालिकांच्या मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल; आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत होणार लागू?

लाडक्या बहिणींची ओवाळणी लाटणाऱ्या भावांना दणका; राज्य सरकार पैसे परत घेणार; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा