photo : x (@Irlofficial1)
क्रीडा

गांगुलीच्या उपस्थितीत भारतीय रेसिंग फेस्टिव्हलची घोषणा; ऐतिहासिक ड्रायव्हर ड्राफ्टने मुंबईतील २०२५ हंगामाची सुरुवात

Indian Racing League 2025 : ‘इंडियन रेसिंग लीग’ने (आयआरएल) २०२५ हंगामासाठीची संपूर्ण संघरचना ‘ड्रायव्हर ड्राफ्ट’द्वारे जाहीर केली असून, यात आंतरराष्ट्रीय विजेते, भारतीय टॅलेंट्स आणि महिला रेसर्स यांचा समावेश असलेले २४ ड्रायव्हर्स सहा फ्रँचायझींमध्ये निवडले गेले. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि बॉलीवूडमधील तारे उपस्थित होते.

Swapnil S

मुंबई : ‘इंडियन रेसिंग लीग’ने (आयआरएल) २०२५ हंगामासाठीची संपूर्ण संघरचना ‘ड्रायव्हर ड्राफ्ट’द्वारे जाहीर केली असून, यात आंतरराष्ट्रीय विजेते, भारतीय टॅलेंट्स आणि महिला रेसर्स यांचा समावेश असलेले २४ ड्रायव्हर्स सहा फ्रँचायझींमध्ये निवडले गेले. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि बॉलीवूडमधील तारे उपस्थित होते.

इंडियन रेसिंग फेस्टिव्हलच्या (आयआरएफ) २०२५च्या हंगामाने आपल्या प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड जोडला, तो म्हणजे ‘इंडियन रेसिंग लीग’साठी (आयआरएल) प्रथमच अधिकृत ‘ड्रायव्हर ड्राफ्ट’. मुंबईतील प्रतिष्ठित ‘ताज लँड्स एंड’ येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात फ्रँचायझी मालक, लीग अधिकारी आणि प्रसारमाध्यमे एकत्र आली आणि या मोसमाची औपचारिक सुरुवात झाली. संघ तयार करण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी या कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. हा हंगाम जागतिक पातळीवरील स्पर्धा, जागतिक दर्जाचे टॅलेंट आणि प्रेक्षकांशी वाढती गुंतवणूक यासाठी ओळखला जाणार आहे.

या ड्राफ्टमध्ये प्रत्येक फ्रँचायझीने चार ड्रायव्हर निवडले. त्यामध्ये एक अनुभवी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हर, एक उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय किंवा भारतीय वंशाचा चालक, एक देशांतर्गत भारतीय चालक आणि एक महिला चालक आदींचा समावेश होता. निवड केवळ प्रतीकात्मक नसून, रणनीतिक दृष्ट्याही महत्त्वाची होती. टीम्सनी त्यांच्या चालकांची निवड ड्रायव्हिंग स्टाइल, ट्रॅकचा अनुभव आणि परफॉर्मन्स डेटाच्या आधारे केली.

अंतिम ग्रिडमध्ये काही आघाडीची आणि प्रतिष्ठित नावे झळकली आहेत. नील जानी (माजी फॉर्म्युला वन टेस्ट ड्रायव्हर आणि ले मांस विजेता), जॉन लँकास्टर (जीपी २ आणि एंड्युरन्स रेसिंगमध्ये भरपूर अनुभव असलेले ड्रायव्हर) आणि राऊल हायमॅन(भारतीय वंशाचा दोन वेळेचा आयआरएल चॅम्पियन) यांचा समावेश आहे. याशिवाय रुहान अल्वा, सोहिल शहा, साई संजय आणि अक्षय बोहरा आदी तरुण गुणवंत आपल्या वेगवान आणि धारदार रेसिंग कौशल्यामुळे नजरा खिळवून ठेवतात. महिला ड्रायव्हरमध्ये फॅबिएन वोल्वेंड, गॅब्रिएला जिल्कोवा आणि केटलीन वूड यांचा समावेश असून त्यांनी डब्ल्यू सीरिज, एफ थ्रीआणि जीटी रेसिंग फॉरमॅट्समध्ये आंतरराष्ट्रीय अनुभव प्राप्त केलेला आहे. त्यामुळे या सीझनचा थरार आणखी वाढणार हे निश्चित.

ड्राफ्टनंतर सहा संघ मालकांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारतीय चित्रपटसृष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वे संघमालक म्हणून उपस्थित होती. त्यांनी त्यांच्या संघांची अधिकृत घोषणा केली आणि लीगबाबतचा आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. प्रत्येक फ्रँचायझीने त्यांच्या तांत्रिक टीमसह संपूर्ण नियोजन करून संघ बांधणी केली. केवळ स्पर्धात्मक दृष्टिकोन न ठेवता, एक ब्रँड तयार करण्यावर भर दिला गेला आहे. एकंदर आता या लीगची उत्सुकता लागून आहे.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: १९ नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; बारामती, अंबरनाथमध्ये पुन्हा गोंधळ

मुंबईच्या नावासाठी उद्धव ठाकरे कडाडले, 'जिथे-जिथे बॉम्बे लिहलंय तिथे...

BLO च्या मानधनात वाढ, पण राज्य सरकारकडून विलंब; निवडणूक आयोगाची तक्रार

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; बूथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ

Mumbai : पोलीस कॉन्स्टेबलच्या गर्भवती पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल